IPL मधून प्रिती झिंटा किती कमावते? तिची एकूण संपत्ती किती?

IPL मधून प्रिती झिंटा किती कमावते? तिची एकूण संपत्ती किती?

अभिनेत्री प्रिती झिंटा अत्यंत आलिशान आयुष्य जगते. ती लवकरच ‘लाहोर 1947’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रितीच्या ‘पंजाब किंग्ज’ या क्रिकेट टीमने ‘आयपीएल 2025’च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ती आयपीएल आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून भरभक्कम कमाई करते. यंदाच्या सिझनमध्ये प्रितीच्या टीमने सुरुवातीपासूनच दमदार कमाई केली आहे. आयपीएलच्या क्लालिफायर 2 राऊंडमध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. आता अंतिम सामना हा पंजाब किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असा रंगणार आहे. यादरम्यान पंजाब किंग्जची सहमालक प्रिती झिंटा तिच्या टीममधून किती पैसे कमावते, ती एकूण संपत्ती किती आहे ते पाहुयात..

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिती झिंटाची एकूण संपत्ती 183 कोटी रुपयांच्या घरात आहे. ती बिझनेस आणि ब्रँड एंडोर्समेंट यातून कमावते. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती 1.5 कोटी रुपये घेते. 2008 मध्ये प्रिती झिंटा आयपीएल टीम पंजाब किंग्जची सहमालक बनली. ‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या माहितीनुसार, तिने त्यावेळी 35 कोटी रुपये गुंतवले होते, जे आता 350 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 2008 मध्ये जेव्हा पंजाब किंग्जची सुरुवात झाली, तेव्हा ते 76 दशलक्ष डॉलर्सना विकत घेण्यात आलं होतं. 2022 पर्यंत त्याचं मूल्य 925 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

आयपीएलमधील तिकिट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात आयपीएल टीमच्या मालकांचाही वाटा असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकीट विक्रीचा 80 टक्के भाग संघ मालकांच्या खात्यात जातो. इतकंच नव्हे तर टीम प्रायोजकत्वाद्वारेही पैसे कमावले जातात.

प्रिती झिंटाची विविध ठिकाणी संपत्ती आहे. हाऊसिंग डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मुंबईत पाली हिल्स परिसरात तिचं 17.01 कोटी रुपयांचा अपार्टमेंट आहे. याशिवाय शिमल्यातही तिचं एक घर आहे. त्याची किंमत सुमारे सात कोटी रुपये इतकी आहे. लग्नानंतर प्रिती लॉस एंजेलिसला राहायला गेली. तिथे ती पती जीन गुडइनफ आणि दोन मुलांसोबत राहते. बेव्हरली हिल्समध्ये त्यांचं एक मोठं घर आहे. प्रितीला आलिशान गाड्यांचाही शौक आहे. तिच्याकडे बारा लाख रुपयांची लेक्सस एलएक्स 400 क्रॉसओव्हर आहे. याशिवाय तिच्याकडे पोर्शे, मर्सिडीज बेंझ ई क्लास (58 लाख रुपये) आणि बीएमडब्ल्यूदेखील आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल