पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कधी पकडणार? काँग्रेसने केंद्र सरकारला विचारले 5 महत्त्वाचे प्रश्न
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारला सवाल विचारला आहे की, कोणाच्या दबावाखाली शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली? पहलगाममध्ये पती गमावलेल्या महिलांना न्याय मिळाला का? खेरा यांनी विचारले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कधी पकडले जातील?
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना पुलवामा हल्ल्यात वापरल्या गेलेल्या आरडीएक्सबाबतही केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कधी पकडले जाईल, पुलवामामध्ये आरडीएक्स कोणी आणले? हाफिज सईद, अझहर मसूद आणि दाऊद इब्राहिम यांना परत आणण्यासाठी तुम्ही शस्त्रसंधी करताना अट घातली होती की नाही? याशिवाय पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीच्या अटी काय होत्या? असा प्रश्नही त्यांनी केंद्राला विचारला आहे.
#WATCH दिल्ली: कांग्रेस नेता पवन खेड़ा ने कहा, “कांग्रेस लगातार सवाल पूछ रही है कि पहलगाम हमले के आतंकवादी कब पकड़े जाएंगे, पुलवामा में RDX किसने खरीदा और पाकिस्तान के साथ संघर्ष विराम की क्या शर्तें थीं?…हम पूछे जा रहे कड़े सवालों के कड़े जवाब चाहते हैं। किसके दबाव में संघर्ष… pic.twitter.com/I20T7PLYgk
— ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List