भुर्रर्र… मुंबईहून थेट मँचेस्टरला जाता येणार, इंडिगोची लंडनसह 10 शहरांत डायरेक्ट विमानसेवा
देशातील एअरलाइन कंपनी इंडिगो आता आपल्या विमानसेवेचा आणखी मोठा विस्तार करणार आहे. लंडन आणि एथेन्सह जगातील 10 प्रमुख ठिकाणी इंडिगोची विमान सेवा थेट सुरू करण्यासाठी कंपनीने तयारी केली आहे. इंडिगोची विमान सेवा अॅमस्टरडम (नेदरलँड), मॅंचेस्टर (यूके), कोपनहेगन (डेन्मार्क), सिएम रीप (कंबोडिया) तसेच मध्य आशियाच्या चार ठिकाणी ही थेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. इंडिगो जुलैमध्ये बोइंग 787-9 विमानांसोबत मुंबईहून मॅन्चेस्टर आणि अॅमस्टरडमसाठी ही सेवा सुरू करणार आहे. ब्रिटनच्या शहरासाठीसुद्धा एअरलाईन आपली सेवा सुरू करणार आहे.
इंडिगोकडे सध्या 430 हून अधिक विमानांची संख्या आहे. 90 हून अधिक देशांतर्गत आणि 40 आंतरराष्ट्रीय देशात विमान सेवा सुरू आहे. 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मिळकत असलेली इंडिगो विमान कंपनी जगभरात आपली सेवा देते. 430 विमान सेवेद्वार इंडिया कंपनी दररोज दोन हजार 300 हून अधिक विमानांचे उड्डाण चालवते. सध्या इंडिगो देशांतर्गत 45 टक्के तर आंतरराष्ट्रीय स्तरांवर 55 टक्के सेवा देते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List