प्रियांक पांचाळ प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त
गुजरातचा माजी कर्णधार प्रियांक पांचाळने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची आज घोषणा केली. तो राष्ट्रीय क्रिकेटमध्ये गुजरातचा मुख्य आधारस्तंभ होता. त्याने आपल्या फलंदाजीने अनेक दमदार खेळय़ा करून संघाला विजय मिळवून दिलेत. प्रियांकला हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी कधीही लाभू शकली नाही. मात्र त्याने ‘हिंदुस्थानी अ’साठी चांगली कामगिरी केली, ज्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्याची संधी निर्माण झाली. पण, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होऊ शकला नाही.
सलामीवीर प्रियांकने 97 लिस्ट ए सामन्यात 40.80च्या सरासरीने 3672 धावा केल्या, त्यात 8 शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 59 टी-20 सामन्यांत 28.71 च्या सरासरीने 1522 धावा केल्या आहेत आणि त्यात 9 अर्धशतपं आहेत. त्याने 17 वर्षे क्रिकेटची सेवा केली आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व केले. त्याने काही काळ ‘हिंदुस्थानी अ’ संघाचे नेतृत्वही सांभाळले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List