पालघरमध्ये ट्रेलरच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू
भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगेश आणि पूजा विश्वकर्मा अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर माहीम रस्त्यावरील हरणवाडी येथील एका रहिवासी संकुलात मंगेश आणि पूजा विश्वकर्मा आपल्या कुटुंबासह राहत होते. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ते दोघे जेवण करून आईस्क्रीम खाण्यासाठी पालघर शहरात गेले होते. आईस्क्रीम खाऊन ते दुचाकीवरून घराकडे जात असताना भरधाव ट्रेलरने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List