काय नान्या, श्रीमंत झालास का? नाना पाटेकरांना असं का म्हणाले अशोक सराफ?
अभिनेते अशोक सराफ आणि नाना पाटेकर हे सिनेसृष्टीतील अत्यंत दिग्गज कलाकार आहेत. 'हमिदाबाईंची कोठी' या गाजलेल्या नाटकात दोघांनी एकत्र काम केलं. या नाटकाच्या एका प्रयोगाच्या वेळी नानांनी अशोक सराफ यांचा जीवसुद्धा वाचवला होता. नानांनी त्यावेळी जे केलं त्याची मी कधीच परतफेड करू शकत नाही, असं अशोक सराफ आजही म्हणतात.
'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात अशोक सराफांनी नानांचा आणखी एक किस्सा सांगितला आहे. नानांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवाला गणपती बाप्पाचं आगमन होतं. परंतु त्या काळात त्यांच्याकडे फार पैसे नव्हते. म्हणून एका वर्षी नानांनी अशोक सराफांकडे मदत मागितली होती.
नानांनी अशोक सराफांकडे तीन हजार रुपये मागितले होते. तेव्हा अशोक सराफांनी त्यांना थेट ब्लँक चेक दिला होता. गरज असेल तेवढी रक्कम घे, असं त्यांनी नानांना सांगितलं होतं. पण नानांनी मात्र मागितल्याप्रमाणे तीन हजार रुपयेच घेतले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List