मोठी बातमी! ‘सिंधू पाणी वाटप करार स्थगित केलाच नाही’, बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, दिला त्या पत्राचा संदर्भ

मोठी बातमी! ‘सिंधू पाणी वाटप करार स्थगित केलाच नाही’, बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, दिला त्या पत्राचा संदर्भ

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी नाव विचारून गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्थानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती दिली आहे, यावरून दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, सिंधू नदी पाणी वाटप करार भारत सरकारनं रद्द केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 

पाकिस्तानला पाणी बंद केल्याचं पत्र देण्यात आलं आहे. मात्र पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही असा कुठेही पत्रात उल्लेख केलेला नाही. याचाच अर्थ सिंधू पाणी वाटप करार भारत सरकारनं रद्द केलेला नाही. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को असं हे पत्र आहे.  त्यामुळे त्यांनी जर  जनतेला हे पत्र दाखवलं, तर सरकार नेमकी कुठल्या प्रकारची कारवाई करतय हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सिंधू वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून सातत्यानं पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही.
कारण ते थांबवण्यासाठीची व्यवस्था आहे का ? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का ?
त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘भूल चूक माफ’चे निर्माते मोठ्या अडचणीत, ‘तो’ निर्णय महागात पडला, आता काय होणार? ‘भूल चूक माफ’चे निर्माते मोठ्या अडचणीत, ‘तो’ निर्णय महागात पडला, आता काय होणार?
Bhool Chuk Maaf: अभिनेता राज कुमार राव याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं...
आधी सीझफायरबद्दल पोस्ट मग लगेच डिलिट..; सलमानवर भडकले नेटकरी
राक्षस ने कहा तू जाके ” … ” को बता; अखेर अमिताभ बच्चन यांची ऑपरेशन सिंदूरवर सोडलं मौन
शहीदाची लेक प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणते, दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांचं अपहरण केलं आणि…
कोल्हापूर विमानतळ धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत वाढवणार
सेबीची चार कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी
बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदांसाठी भरती