महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक पाकिस्तानी, सर्वाधिक नागरिक नागपूर आणि ठाण्यात; तर 107 जण बेपत्ता

महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक पाकिस्तानी, सर्वाधिक नागरिक नागपूर आणि ठाण्यात; तर 107 जण बेपत्ता

महाराष्ट्रात पाच हजारपेक्षा पाकिस्तानी नागरिक आहेत, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. सर्वाधिक नागरिक हे नागपूर आणि ठाणे जिल्ह्यात असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच काही पाकिस्तानींचा थांगपत्ताही नाही, अशी कबुलीही सरकारने दिली आहे.

प्रत्येक राज्यात किती पाकिस्तानी आहेत, याची माहिती केंद्र सरकारने राज्य सरकारांकडून मागवली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 शहरांत 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक नागरिक हे नागपूर शहरात आढळले आहेत. नागपूरमध्ये 2458 नागरिक असून ठाण्यात 1106 पाकिस्तानी सापडले आहेत. 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिकांपैकी फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्र सापडली आहेत. धक्कादायक म्हणजे 107 नागरिक हे बेपत्ता आहेत. म्हणजेच या 107 नागरिकांचा कुठलाही थांगपत्ता नाहिये.

महाराष्ट्रात असलेले काही पाकिस्तानी हे सार्क व्हिजा आणि शॉर्ट टर्म व्हिजावर आहेत. सार्क व्हिसा आणि शॉर्ट टर्म व्हिसावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसात हिंदुस्थान सोडण्यास सांगितले आहे. तर जे पाकिस्तानी मेडिकल व्हिसावर आहेत त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप
हिंदुस्थान आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या काही तासातच पाकिस्तान पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार व ड्रोन हल्ले केले आहेत. जम्मू काश्मीर...
India Pakistan Ceasefire : पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की नाही? युद्धविरामानंतर काँग्रेसचा सवाल
India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!
India Pakistan Ceasefire : संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम – आदित्य ठाकरे
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार