भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला तणाव आणि हल्ले आता संपले आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवण्यात आलं आहे. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती सांगितली आहे. पाकिस्तान लष्कराच्या डीजीएमओने तणाव कमी करण्यासाठी भारतीय लष्कराच्या डीजीएमओशी संपर्क साधला. यानंतर भारताने स्वतःच्या अटींवर युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली. यामुळे देशभरातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
युद्धविरामनंतर सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटींनीही केल्या भावना व्यक्त
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव होता. पाकिस्तानकडून सतत गोळीबार आणि ड्रोन हल्ले होत होते, ज्याला भारत चोख प्रत्युत्तर देत होता. त्याचा परिणाम काश्मीरमधील पूंछसह इतर ठिकाणीही दिसून आला. अशा परिस्थितीत देशभरात भारतीय सैन्याचे कौतुक होत असतानाचा दुसरीकडे मात्र भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, आता सर्वांनी आता भारत-पाकच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आणि समाधानही व्यक्त केलं आहे. युद्धबंदीच्या बातमीनंतर सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटींनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
खुशबू पटानीची पोस्ट
दिशा पटानीची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी आणि मलायका अरोरा यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोघांनीही त्यांच्या इंस्टा स्टोरीद्वारे सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्यावर तिने लिहिले आहे, ‘युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. आज जल, जमीन आणि हवेत युद्धबंदी आहे. युद्ध थांबले आहे. दोन्ही बाजूंनी आता युद्ध थांबलं आहे. दोघेही गोळीबार थांबवतील.’ असंही तिने म्हटलं आहे.

मलायका अरोराची इन्स्टा स्टोरी
तर मलायका अरोराने तिच्या इंस्टा स्टोरीवर ही बातमी शेअर करत लिहिलं आहे की, ‘देवाचे आभार.’ अशापद्धतीने सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचं भारताने दिलं चोख प्रत्युत्तर
22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारत हादरला. या हल्ल्यात पहलगामला भेट देण्यासाठी आलेल्या निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी मारले. यामुळे देशभरात केवळ दुःखाची लाटच निर्माण झाली नाही तर सर्वांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली. दहशतवाद्यांकडून झालेल्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकारने भारतीय सैन्यासह ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. भारताच्या या कारवाईत अनेक दहशतवादी आणि त्यांच्याशी संबंधित लोक मारले गेले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List