पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा होणार अधिकारी
उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगर येथील इक्बाल अहमदने यूपीएससी परीक्षेत देशातून 998 क्रमांक पटकावला. इक्बालचे वडील मकबुल अहमद हे नंदौर येथे सायकल पंक्चरचे दुकान चालवतात. इक्बालला तीन भाऊ तर दोन बहिणी आहेत. इक्बालने गावातील सरकारी शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण खासगी शाळेत घेऊन बीएच्या अभ्यासासोबत त्याने यूपीएससीची तयारी केली. अभ्यासाचे वेळापत्रक लावून मन लावून अभ्यास केल्याने इक्बालचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. यूपीएससी पास होण्याआधी इक्बालने उत्तर प्रदेश लोक सेवा आयोग (यूपीपीएससी) उत्तीर्ण केली आहे. इक्बाल सध्या बस्ती जिह्यात श्रम प्रवर्तन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. इक्बालने नोकरी आणि लग्न झाल्यानंतर यूपीएससीची तयारी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List