शक्तिपीठ विरोधातील हरकतींची सुनावणी सुरु; मिरजमधील 100 शेतकऱ्यांची सुनावणी

शक्तिपीठ विरोधातील हरकतींची सुनावणी सुरु; मिरजमधील 100 शेतकऱ्यांची सुनावणी

शक्तिपीठ महामार्गाविरोधात दाखल केलेल्या हरकतींची सुनावणी मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे सुरू झाली. मिरज तालुक्यातील माधवनगर, पद्माळे, तासगाव तालुक्यांतील वज्रचेंडे, सावळज गावांतील 129 शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलावले होते. यापैकी जवळपास शंभरहून जास्त शेतकऱ्यांनी हजेरी लावून ‘साहेब, शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नकोच’, अशी भूमिका मांडली आहे. काही मोजक्याच शेतकऱ्यांनी भरपाईबद्दल विचारणा केली.

शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील प्रस्तावित द्रुतगती मार्ग असून, जो नागपूर आणि गोवा या शहरांना जोडतो. हा मार्ग ८०२ किलोमीटर लांब असून, सहा लेनचा आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर बागायत जमिनी जाणार असून, कृष्णा, वारणा नद्यांवर मोठा पूल होणार आहे. यामुळे कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येणार आहे तसेच अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नको आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी सुनावणीवेळी मांडली. तसेच लेखी भूमिकाही प्रांताधिकारी कार्यालयाकडे दिली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. दि. ३० एप्रिलपर्यंत शक्तिपीठ महामार्गाबद्दल सुनावणी सुरू आहे. मिरज तालुक्यातील माधवनगर, पद्माळे, तासगाव तालुक्यातील वज्रचैंडे, सावळज येथील १२९ शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलावले होते. यावेळी किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, प्रवीण पाटील, उमेश एडके, संग्राम पाटील यांच्यासह शेतकरी सुनावणीला उपस्थित होते.

आम्ही महामार्ग होऊच देणार नाही: दिगंबर कांबळे
शक्तिपीठ महामार्ग नकोच, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. शक्तिपीठ महामार्ग का नको, याच्या कारणांसह लेखी पत्रही सादर केले आहे. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. तसेच पर्यावरणाचेही मोठे नुकसान होणार आहे. म्हणून शक्तिपीठ महामार्ग नको, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. आम्ही शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, यासाठी १ मेपासून रस्त्यावरची लढाई चालू होणार आहे, असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला.

सुनावणीसाठी आलेले शेतकरी
गाव (कंसात शेतकरी संख्या) माधवनगर (०२), पद्माळे (४५), सावळज (१९), वज्रचौंडे (६३)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pakistan Asim Munir पाकिस्तानात अराजकता! लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक? Pakistan Asim Munir पाकिस्तानात अराजकता! लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक?
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक झाल्याचे वृत्त सध्या समोर आले आहे. अद्याप पाकिस्तानकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली...
Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानवर 100 क्षेपणास्त्रे डागली, 4 लढाऊ विमाने पाडली, 3 वैमानिक ताब्यात
Operation Sindoor- हिंदुस्थानी सैन्याची कमाल, सीमेवर घमासान! 45 मिनिटे आकाशात ‘सूदर्शन’चा थरार; नंतर पाकिस्तानात तांडव
Operation Sindoor- पाकिस्तानने अमृतसरवर केलेला हल्ला, हिंदुस्थानी सैन्याने परतवुन लावला
Pakistan Attack Civilians पाकिस्तानचे नागरी वस्त्यांवर हल्ले, उरीमधील हॉटेलबाहेर मोठा धमाका
पाकिस्तान दुहेरी संकटात! बलूच लिबरेशन आर्मीकडून हल्ल्याला सुरुवात
पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर