‘बंदूकें भिजवा दी हैं, …’, खेचर मालकांचं फोनवर संवाद, मॉडेल एकता तिवारीने सांगितला थरारक अनुभव

‘बंदूकें भिजवा दी हैं, …’, खेचर मालकांचं फोनवर संवाद, मॉडेल एकता तिवारीने सांगितला थरारक अनुभव

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान आता या हल्ल्याबाबत नवीन माहिती समोर येत आहे. बुधवारी या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे छायाचित्र व्हायरल झाले. यानंतर आता कश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांधील महिलांसोबत गैरवर्तन केल्याचे प्रकरणही समोर आले आहे. यासंदर्भात जौनपूरची रहिवाशी, मॉडेल एकता तिवारी हिने पोस्ट शेअर करत भयंकर अनुभव सांगितला आहे.

जौनपूरची रहिवाशी एकता तिवारी आपल्या कुटुंबासह कश्मीरमध्ये फिरण्यासाठी आली होती. 13 एप्रिल रोजी ती तिच्या कुटुंबासह जौनपूरहून वैष्णोदेवी यात्रेसाठी निघाली होती. यानंतर 16 एप्रिल रोजी ती श्रीनगरला आली आणि तिथून ती श्रीनगरमधील सोनमर्गला भेट देण्यासाठी निघाली. 20 एप्रिल रोजी, पहलगाममध्ये पोहोचली.यावेळी तिला आलेले भयंकर अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने पहलगाम येथील खेचर मालकाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

खेचर मालकाचा संबंध एखाद्या दहशतवादी टोळीशी असू शकतो, असा संशय एकताने व्यक्त केला. तेथील एका खेचर मालकाचे वर्तन आम्हाला विचित्र वाटले. त्याच्याकडे एक छोटा फोन होता आणि तो फोन वारंवार बाहेर काढायचा आणि कोणाशी तरी बोलल्यानंतर तो त्याच्या बुटांमध्ये लपवायचा. यावेळी एकताने या खेचर मालकाला फोनवर बोलताना एकले होते. बंदुका पाठवल्या आहेत, पण ब्रेक फेल झाले नाहीत, असे तो कोणालातरी वारंवार फोनवर सांगत होता. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. मात्र ज्यावेळी तिला संशय आला तेव्हा तिने खेचर चालकाचा फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. आणि ती घटनास्थळावरून निघून गेली, असे तिने सांगितले.

एवढेच नाही तर तेथील अनेक पर्यटंकांना तुम्ही लोक कुराण का वाचत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. यानंतर माझ्या भावाने रुद्राक्ष घातल्याबद्दल त्यालाही वाईट वागणूक देण्यात आली. एकताने ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

एकता तिवारी 2016 पासून जयपूर, राजस्थान येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रेमनगर दौसा शाखेच्या शाखा व्यवस्थापक आहे. 2020 मध्ये नोकरी सोडल्यानंतर, ती 2023 मध्ये जौनपूरमधील मौर्य मार्केटमध्ये राहू लागली. तिचे पती प्रशांत तिवारी हे जल निगममधील जल जीवन मिशनचे वरिष्ठ अभियंता आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर
हिंदुस्थानने जैलसलमेरमध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यातील पायलटला ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप या पायलटबाबतची कोणतीही माहिती समोर...
Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदर उद्ध्वस्त!
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव वाढला; विमान सेवा कंपन्यांचे निवेदन जारी
Big Breaking Operation Sindoor- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किमी अंतरावर मोठा स्फोट
देशाच्या सार्वभौमत्वाचे व जनतेचे संरक्षण करायला आम्ही पूर्णपणे तयार, हिंदुस्थानी संरक्षण दल सज्ज
Opertion Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची एअर वॉर्निंग सिस्टीम (AWACS) केली नष्ट
Operation Sindoor- पाकिस्तानने हमास स्टाईलने हल्ला केला, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर