गोकुळधाम फेडरेशनवर सभासदांचा विश्वास
गोरेगावच्या गोकुळधाम फेडरेशनने स्वयं-पुनर्विकासाचा अभ्यास करून सर्व बाबी सभासदांसमोर ठेवल्या होत्या. त्यावेळी सभासदांनी विकासकांकडून पुनर्विकास करण्याला बहुमताने पसंती दिली आहे, अशी माहिती राष्ट्रीय मजदूर गोकुळधाम सीएचएस फेडरेशनने दिली आहे.
गोरेगावच्या गोकुळधाममधील गिरणी कामगारांची वसाहत ही जुनी वसाहत असून या वसाहतीचा पुनर्विकास ही काळाची गरज बनली आहे. या वसाहतीतील हजार परिवारांचे नेतृत्व करणारी फेडरेशन ही अधिकृत आणि उपनिबंधक कार्यालयातून घेण्यात येणाऱ्या निवडणुकीतून निवडून आलेली कमिटी ही सभासदांच्या वतीने प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. फेडरेशन संस्था 79ए तसेच इतर नियमांचे पालन करून त्याप्रमाणे बहुमतांनी सर्व निर्णय घेत आली आहे, अशी माहिती फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List