आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?

आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?

राज्यात पुन्हा एकदा वारं पालटलं आहे. गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी दोन्ही नेतृत्वाने एकत्र येण्याविषयी चाचपणी केली होती. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याविषयी त्यांनी मार्ग खुला असल्याचे मतं मांडलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अटी-शर्तींआधारे एकत्र येण्याची हाळ दिली. त्यानंतर याविषयी उद्धव ठाकरे गटाची भूमिका खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली.

अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेची मनसेविषयीची भूमिका काय यावर भाष्य केले. त्यांनी भाजपावर निशाणा साधताना मनसेसोबतच्या मनोमिलनावर कटाक्ष टाकला.

लोकसभा, विधानसभेवेळी आमची भूमिका होती. याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारे मदत होईल अशी भूमिका घेऊ नये. आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. ही भूमिका आमची आजही आहे. उद्धव ठाकरे यांनी नम्रपणे सांगितलं आहे, आजही अशा शक्ती आहेत, ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थान सुरू आहेत. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही. अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही. अशी भूमिका घेणं सर्वांनी गरजेचं आहे. महाराष्ट्राचे शत्रू, शिवाजी महाराजांचे शत्रू, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे. त्यानंतर आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं म्हणणं सांगू, असे मत संजय राऊत यांनी मांडले.

महाराष्ट्राबाबत सध्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात एक. अशा महाराष्ट्र शत्रूंना घरात थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे. याच भूमिकेचा पुरस्कार राज ठाकरे किंवा त्यांच्या पदाधिकार्‍यांनी करायला पाहिजे. भाजपचे बगलबच्चे शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व नष्ट करायचं आहे. त्यांना ठाकरे या नावाचं अस्तित्वच मिटवायचं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सध्या वेट अँड वॉचची भूमिका

राज ठाकरे छत्रपती शिवरायांसमोर उद्धव ठाकरे यांच्या अटी आणि शर्तींच्या अनुषंगाने वचन देत असतील पुढील विचार करता येईल असे संकेत संजय राऊत यांनी दिले. जर दोन्ही प्रमुख ठाकऱ्यांनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करत आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतल्यावर आम्ही प्रतिक्षा करू. वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू, असे राऊतांनी स्पष्ट केले. आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्यांकडे पाहत आहोत. हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे, असे राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा.. आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
एखाद्या श्रेत्रात आपल्या सोबतची व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागली की काहींना असुरक्षित वाटू लागतं. मग अशातून एकमेकांविषयी ईर्षा, द्वेष आणि...
मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?
आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन म्हणत अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील कुटुंबाला लुटले! गाडीसमोर आडवी गाडी लावली 12 लाखांच्या दागिन्यांची लूट
लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – संजय राऊत
12 दिवस होऊनही सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, संजय राऊत यांचा घणाघात
पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार