Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचं दिवाळीचं खास गिफ्ट, “BIGG BOSS” चं स्पेशल ब्रेसलेट पाहिलं का ? Video व्हायरल

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचं दिवाळीचं खास गिफ्ट, “BIGG BOSS” चं स्पेशल ब्रेसलेट पाहिलं का ? Video व्हायरल

बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन संपून महीना होत आला तरी या शोमधील अनेक स्पर्धक अजूनही चर्चेत आहे. सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, यांच्यासोबतच जान्हवी किल्लेकरही प्रचंड चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूपच ॲक्टिव्ह आहे. तिच्या विविध पोस्ट्स , व्हिडीओवरं लाईक्सचा , कमेंट्सचा पाऊस पडतो, काही दिवसांपूर्वीच तिने दिवाळीत सासूबाईंचे पाय धुतल्याचा, त्यांची पूजा केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. संस्कारी सून म्हणत नेटकऱ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं होतं. ही दिवाळी जान्हवीसाठी खास आहे. आणि त्याच सणानिमित्त तिने बिग बॉसच्या आठवणींना उजाळा देत स्वत:साठी एक खास खरेदी केली. त्याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे. काय आहे तिचं गिफ्ट ?

विकत घेतलं खास ब्रेसलेट

जान्हवीने काल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पेशल व्हिडीओ शेअर करत तिच्या खास गिफ्टची सगळ्यांना झलक दाखवली. यामध्ये सर्वप्रथन तिने सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिल्यात. आणि हा व्हिडीओ बनवण्यामागचं कारणही तिने शेअर केलं. ‘ काल पाडव्याच्या निमित्ताने मी स्वत:साठीच एक छान गिफ्ट घेतलं आहे. ते छोटसं आहे, पण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे’ असं सांगत जान्हवीने त्या गिफ्टची झलक दाखवली. एका हिरव्या रंगाचा व्हेल्वेट बॉक्स उघडून तिने त्यातलं स्पेशल ब्रेसलेट दाखवलं. त्यामध्ये एक सोन्याचं ब्रेसलेट होतं, त्याच्या मध्यभागी इव्हिल आय दिसलं.

बिग बॉस माझ्यासाठी महत्वाचे

जान्हवीने ते ब्रेसलेट सर्वांना दाखवलं. ‘ हे खरंतर इव्हिल आय आहे. पण माझ्यासाठी हे बिग बॉसचं साईन आहे.बिग बॉस माझ्या आयु्ष्यात खूप महत्वाचे आहेत. कारण आज मी जे काही आहे ते बिग बॉसमुळेच आहे. सो आता मी असं ठरवलं आहे की बिग बॉसच्या नावाचं ब्रेसलेट मी आता हातात घालणार आहे. काल स्पेशली जाऊन मी हे बिग बॉसचं ब्रेसलेट विकत घेतलंय’ असं जान्हवीने सांगितलं. तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं हे ब्रेसलेट ते कमेंटमध्ये सांगा, असं आव्हानही तिने चाहत्यांना केलं.

 

चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस

तिचा हा व्हिडीओ आणि हे नवं ब्रेसलेट तिच्या चाहत्यांना खूप आवडलंय. त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा दिल्या आहेत. ‘ दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान ब्रेसलेट आहे ज्या गोष्टीमुळे आपल्याला खूप सहकार्य लाभले त्या बिग बॉसचे ब्रेसलेट बनवले खूप छान वाटलं’, अशी कमेंट एकाने केली. ‘ हे ब्रेसलेट आणि तू दोघेही मस्त आहात’, अशी कमेंटही दुसऱ्याने केली.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार! दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती...
आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम
मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!
कृष्णानगर स्पाईन रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील बेकायदेशीर अवजड
नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा
वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार