मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदने हिंदुस्थानच्या सैनिकांविरोधात ओकली गरळ, म्हणाला…

मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदने हिंदुस्थानच्या सैनिकांविरोधात ओकली गरळ, म्हणाला…

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड व लष्कर ए तोयबा व जमात उद दावा या दहशतवादी संघटनांचा संस्थापक हाफीज सईद याचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो हिंदुस्थानला धमकी देत असल्याचे दिसत आहे. ज्याप्रकारे कश्मीरी मुजाहिद्दीनने तुमच्या सैन्यांचे तुकडे तुकडे केले, तसेच ते हिंदुस्थानचेही करतील, असे एक्सवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये तो बोलतोय.

पाकिस्तानला दहशतवाद्यांचे आश्रयस्थान मानले जाते. हाफिज सईदसारखे खतरनाक दहशतवादी शेजारील देशात वास्तव्यास आहेत. 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. याशिवाय त्याचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशीही संबंध आहेत. तो पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने हिंदुस्थानात दहशत पसरवण्याचे काम करतो. हिंदुस्थानातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे

हाफिज सईदशी संबंधित हा एक जुना व्हिडिओ असून पाकिस्तानी अनटोल्डने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे. तो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हाफिज सईदला 2020 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद विरोधी न्यायालयाने अनेक दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दोषी ठरवून तुरुंगात टाकले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;