LS Election 2024 Phase 2 Voting : लोकसभा निवडणुकीसंदर्भात सुनील गावस्करांच भाष्य, म्हणाले…VIDEO व्हायरल

LS Election 2024 Phase 2 Voting : लोकसभा निवडणुकीसंदर्भात सुनील गावस्करांच भाष्य, म्हणाले…VIDEO व्हायरल

IPL 2024, Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting : देशात एकाबाजूला इंड‍ियन प्रीम‍ियर लीगचे सामने सुरु आहेत, तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणुका सुरु आहेत. आज 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना झाला. RCB आणि SRH मध्ये हैदराबादला हा सामना खेळला गेला. RCB ने 35 धावांनी ही मॅच जिंकली. 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी नागरिकांना मतदान करण्याच आवाहन केलं आहे. सुनील गावस्कर यांचा हा व्हिडिओ निवडणूक आयोगाने X वर शेअर केला आहे. ज्यात, गावस्कर RCB विरुद्ध SRH मॅचमध्ये कॉमेंट्री करताना नागरिकांना मतदानाच आवाहन करतात. लोकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

“निवडणुका या लोकशाहीमधला मोठा उत्सव असून भारताचे लोक आपल्या लोकशाही अधिकाराच्या वापरासाठी तयार आहेत” असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. भारतात आज 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 88 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या भागात मतदानाला सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात एकूण किती कोटी मतदार?

या टप्प्यात राहुल गांधी आणि हेमा मालिनी यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकूण 16 कोटी मतदारांसाठी 1 लाख 67 हजार मतदान केंद्र बनवली आहेत. पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान झालं होतं. सातव्या आणि अंतिम टप्पा 1 जूनला पार पडेल. 4 जूनला मतमोजणी आणि निकाल येईल.


देशात आज कुठे मतदान होतय?

आज केरळमधील सर्व 20 जागा कर्नाटकमध्ये 14, राजस्थानमध्ये 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 8-8, मध्य प्रदेशात 6, आसाम आणि बिहारमध्ये 5-5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमध्ये 3-3, त्रिपुरात 1 आणि जम्मू-कश्मीरमध्ये लोकसभेच्या दोन जागांसाठी मतदान होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;