तुरुंगवारी टाळण्यासाठीच केरळच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाशी समझोता केला; प्रियांका गांधी यांचा हल्ला

तुरुंगवारी टाळण्यासाठीच केरळच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाशी समझोता केला; प्रियांका गांधी यांचा हल्ला

केरळचे मुख्यमंत्री पनरई विजयन यांनी तुरुंगवारी टाळण्यासाठीच भाजपाशी समझोता केला, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत जोरदार हल्ला केला. अनेक घोटाळे बाहेर येऊनही मोदी सरकारने विजयन यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नसल्याकडे प्रियंका गांधी यांनी लक्ष वेधले.

माकपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत. परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पेंद्र सरकारने त्यांच्या विरोधात अद्याप कारवाई केलेली नसल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. केरळचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्यावर आरोप करतात, पण भाजपाविरोधात अवाक्षरही काढत नाहीत. जेव्हा कुणी योग्य व्यक्ती मैदानात उतरतो तेव्हा त्याच्याविरोधात सर्व शक्ती एकत्र येतात, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. दरम्यान, राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसकडून वायनाड येथून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;