महाराष्ट्रात 50 हून अधिक वर्षे राहूनही अद्याप मराठी का शिकता आलं नाही? बिग बींनी सांगितलं कारण

महाराष्ट्रात 50 हून अधिक वर्षे राहूनही अद्याप मराठी का शिकता आलं नाही? बिग बींनी सांगितलं कारण

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी ‘आकाशाची सावली’ ही स्वत: रचलेली मराठी कविता सादर करून त्यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली. मित्राच्या मदतीने त्यांनी ही मराठी कविता रचली होती. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांची आठवण सांगतानाच मराठी भाषा शिकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बिग बी म्हणाले. “तारुण्यात कामामुळे शिकण्यासाठी वेळ नाही मिळाला. पण आता वृद्धापकाळात मला बराच वेळ मिळतो. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असं त्यांनी सांगितलं.

मराठी भाषा शिकण्याविषयी काय म्हणाले बिग बी?

“एका पुरस्कार सोहळ्यात मी मनोगत व्यक्त करायला सुरुवात केल्यानंतर मला प्रेक्षकांनी मराठीत बोला अशी मागणी केली. त्यावर मी त्यांना मी शिकतोय असं सांगितलं आणि मी वाचलो. हा दहा वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. मात्र अजूनही मला मराठी शिकता आलं नाही. तारुण्यात कामामुळे शिकण्यासाठी वेळ नाही मिळाला. पण आता वृद्धापकाळात मला बराच वेळ मिळतो. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असं अमिताभ बच्चन म्हणाले.

लतादीदींची आठवण

यावेळी लतादीदींची आठवण सांगताना बिग बी पुढे म्हणाले, “हल्लीच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमांतून गीत, नृत्य, अभिनय सादर केले जातात. असे कार्यक्रम मीही करतो. त्यासाठी लतादीदी कारणीभूत ठरल्या. मी न्यूयॉर्कमध्ये असताना 1981 मध्ये लतादीदींनी मला बोलावून घेतलं. त्यांचादेखील न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम होणार होता. तेव्हा त्यांनी त्या कार्यक्रमात मी ‘लावारिस’ चित्रपटातील ‘मेरे अंगने में’ हे गाणं सादर करावं, अशी त्यांची इछ्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार मी या कार्यक्रमात गाणं सादर केलं. दीदींमुळे मी चित्रपटांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमही करू लागलो.”

दिग्गजांना पुरस्कार

या सोहळ्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांना संगीत क्षेत्रातील सेवेसाठी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य-चित्रपट-मालिका क्षेत्रातील योगदानासाठी, अभिनेते अतुल परचुरे यांना नाट्य क्षेत्रातील कार्यासाठी, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी तर गायक रुपकुमार राठोड यांना हिंदुस्थानी संगीतातील योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उत्कृष्ट चित्रपटनिर्मितीसाठी विशेष वैयक्तिक पुरस्कार अभिनेता रणदीप हुडाला प्रदान करण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था