गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून शिक्षिकांकडून अमानुष शिक्षा, चार वर्षाच्या विद्यार्थ्याला दोरीने झाडाला लटकवले
शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना ताज्या असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून चार वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकांनी दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबाबत संताप व्यक्त होत आहे.
छत्तीसगडच्या सूरजपूरमधील नारायणपूर गावातील हंस वाहिनी विद्या मंदिर शाळेत हा संतापजनक प्रकार घडला. शाळेजवळील घराच्या छतावरून एका तरुणाने शिक्षिकांचे हे कृष्ण कृत्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं आहे. काजल साहू आणि अनुराधा देवांगन अशी या शिक्षिकांची नावे आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ब्लॉक शिक्षण अधिकारी (बीईओ) डीएस लाक्रा तात्काळ प्रत्यक्ष चौकशीसाठी शाळेत पोहोचले. पुढील कारवाईसाठी तपास अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा शिक्षण अधिकारी (डीईओ) अजय मिश्रा यांनी ही घटनेची पुष्टी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List