डहाणूच्या मेंढवण खिंडीतील जंगलात सापडला माजी फुटबॉलपटूचा मृतदेह, आत्महत्या की हत्या? कासा पोलिसांचा तपास सुरू

डहाणूच्या मेंढवण खिंडीतील जंगलात सापडला माजी फुटबॉलपटूचा मृतदेह, आत्महत्या की हत्या? कासा पोलिसांचा तपास सुरू

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या डहाणूच्या मेंढवण खिंडीतील जंगलात माजी फुटबॉलपटूचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अंडर19 फुटबॉलपटू सागर सोरटी (35) याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सागरने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा पोलीस तपास करत आहेत.

15 नोव्हेंबर रोजी पुणे येथे फुटबॉल खेळण्यास जात असल्याचे सांगून सागर सोरटी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर सागर आणि त्याचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला होता. दरम्यान, थेट 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मेंढवण खिंडीतील जंगलात त्याचा मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एकेकाळी क्रीडा क्षेत्रात चमक दाखवणाऱ्या या प्रतिभावान फुटबॉल पटूच्या निधनाने क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भावाच्या लगीनघाईत सागर तणावाखाली

सागर गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. धाकट्या भावाचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते. यावेळी सागर तणावाखाली असून लग्नासाठी नवे कपडे शिवण्यास त्याने नकारही दिला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट

सागरचा मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई करता येईल, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं?
असं म्हणतात की, आनंद हा दुसऱ्यांना दिल्यावर अधिक वाढतो. म्हणूनच आनंदी राहणे हे आपल्या तब्येतीसाठी उत्तम मानले जाते. आनंदी राहण्यासाठी...
‘सेन्यार’चा धोका, पुढील ४८ तास महत्त्वाचे; या राज्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा
जेम्स वेब टेलिस्कोपचे मोठे यश; विश्वातील सर्वात जुने तारे सापडल्याची शक्यता, अनेक रहस्य उलगडणार
राज कपूर यांचा मुंबईतील बंगला ‘देवनार काॅटेज’ किती कोटींना विकला गेला, वाचा
हिंदुस्थानात अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा धोका वाढला, लॅन्सेंटच्या अहवालानुसार 83 टक्के रुग्ण आढळले
मुंबईतील भुयारी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल
घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, कानाचा तोडला लचका; मुलाची प्रकृती गंभीर