हिंदुस्थानच्या लेकींची कमाल, सलग दुसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक
हिंदुस्थानच्या लेकींनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने चायनीज तैपेईला ३५-२८ अशा फरकाने पराभूत केले.
हिंदुस्थानच्या मजबूत संघासमोर चायनीज तैपेईने एक मोठे आव्हान उभं केलं होतं. परंतु हिंदुस्थानी कर्णधार रितू नेगी आणि उपकर्णधार पुष्पा राणा यांच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत शिस्तबद्ध, आक्रमक आणि संतुलित खेळ करून पूर्ण वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रातच त्यांनी आघाडी घेतली आणि दुसऱ्या सत्रात ती वाढवत चायनीज तैपेईला कोणतीही उलटफेर करण्याची संधीच दिली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List