ईव्हीएममधून मतचोरी करणारे नामर्दाची औलाद, बच्चू कडू यांचा घणाघात
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ, मतचोरी या विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी होत असल्याचा आरोप केला जात असतानाच आता प्रहारचे नेते बच्चू कडू यांनीही यावर भाष्य केले आहे. ईव्हीएममधून मतांची चोरी करणारे नामर्दाची औलाद, असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रहारने तयारी केल्याचे बच्चू कडू म्हणाले. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ईव्हीएममधून मतचोरी करणारे नामर्दाची औलाद असल्याचे ते म्हणाले. तसेच निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल अशी शंका व्यक्त करत बच्चू कडूंनी खळबळ उडवली.
ईव्हीएम मशीनमधून मतांची चोरी होत असून, आपण कोणाला मत दिले हे तपासण्याची सोय नसल्याने बच्चू कडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या कामात पारदर्शकता राहिलेली नाही आणि ही व्यवस्था म्हणजे ‘नामर्दांचे काम’ आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली. मी ज्याला मत द्यायचे ठरवले ते त्याला गेले का दुसऱ्याला हे निवडणूक आयोग सांगू शकत नाही. निवडणूक आयुक्तांना नोटांची गट्टी मिळाले असेल म्हणून ही सगळी लफडी सुरू असावी, असेही ते म्हणाले.
विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List