भाईंदरमधील 40 बिल्डरांना नोटिसा, प्रदूषणामुळे नागरिकांना दमा, खोकला, डोळ्यांचे आजार

भाईंदरमधील 40 बिल्डरांना नोटिसा, प्रदूषणामुळे नागरिकांना दमा, खोकला, डोळ्यांचे आजार

विविध प्रकल्पांतर्गत बांधकामे करताना नियमांचे उल्लंघन करून प्रदूषण करणाऱ्या 40 बिल्डरांना मीरा-भाईंदर महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. या बेजबाबदार विकासकांमुळे शहरातील हवा दूषित झाली असल्यामुळे नागरिकांचा श्वास गुदमरू लागला आहे. शहरात दमा, खोकला व डोळ्यांच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रशासन अॅक्शन मोडवर आली आहे. शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने 28 प्रकारची नियमावली जाहीर केली असून त्याचे उल्लंघन झाल्यास प्रकल्प सील करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मीरा-भाईंदर शहरात सध्या विविध प्रकारची 100 हून अधिक बांधकामे सुरू आहेत. या बांधकाम प्रकल्पांमुळे पसरणारी धूळ वाढलेल्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नियमावली जाहीर करण्यात आली. नियमांमध्ये सर्वाधिक निर्देश बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत. वायू गुणवत्ता निर्देशांक सातत्याने 200 पेक्षा अधिक राहिल्यास त्या परिसरातील उद्योग आणि बांधकामे ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन-4 अंतर्गत बंद करण्यात येणार आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पाची बांधकाम परवानगी रद्द करणार असल्याचा इशाराही पालिकेनी दिला आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास करून हवा प्रदूषण करणारे बांधकाम प्रकल्प, आरएमसी प्लाण्ट व खोदकाम करणाऱ्या 40 हून अधिक विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. उर्वरित बांधकामांची पाहणी करण्यासाठी महापालिकेकडून सर्व प्रभागांत 6 विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
– पुरुषोत्तम शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं?
असं म्हणतात की, आनंद हा दुसऱ्यांना दिल्यावर अधिक वाढतो. म्हणूनच आनंदी राहणे हे आपल्या तब्येतीसाठी उत्तम मानले जाते. आनंदी राहण्यासाठी...
‘सेन्यार’चा धोका, पुढील ४८ तास महत्त्वाचे; या राज्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा
जेम्स वेब टेलिस्कोपचे मोठे यश; विश्वातील सर्वात जुने तारे सापडल्याची शक्यता, अनेक रहस्य उलगडणार
राज कपूर यांचा मुंबईतील बंगला ‘देवनार काॅटेज’ किती कोटींना विकला गेला, वाचा
हिंदुस्थानात अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा धोका वाढला, लॅन्सेंटच्या अहवालानुसार 83 टक्के रुग्ण आढळले
मुंबईतील भुयारी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल
घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, कानाचा तोडला लचका; मुलाची प्रकृती गंभीर