शिवसेना पक्षाची चिपळूण नगरपरिषद निवडणूक मोहीम वेगात, विनायक राऊत यांनी घेतला तयारीचा आढावा
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व सचिव विनायक राऊत यांनी आज इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल, गोवळकोट रोड येथे भेट देत चिपळूण नगरपरिषद निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. “मशाल” चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांना त्यांनी मार्गदर्शन करून निवडणुकीत जोरदार कामगिरी करण्याचे आवाहन केले.
भेटीदरम्यान उमेदवार व शहर पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक रणनीती, बूथ पातळीवरील संघटन, मतदार संपर्क आणि शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत सखोल चर्चा झाली. पक्ष संघटना एकजुटीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि व्यापक जनसंपर्काच्या बळावर निवडणुकीत उतरावी, असा संदेश राऊत यांनी दिला. या वेळी उपस्थित जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांनीही उमेदवारांना जनसंपर्क मोहीम, संघटन बळकटीकरण आणि बूथ व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा संपर्कप्रमुख नेहा माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रद्युम्न माने, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, महिला आघाडी शहर संघटिका वैशाली शिंदे, युवासेना पार्थ जागुष्टेसह सर्व विभाग प्रमुख, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राऊत यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून येत्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मोहीम अधिक जोमाने आणि वेगाने पुढे सरकणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List