मतदार यादीत घोळ, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच कबुली

मतदार यादीत घोळ, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच कबुली

राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घोळ असल्याचा पर्दाफाश महाविकास आघाडीने अनेकदा केला. दुबार नावे, चुकीचे पत्ते व फोटो तसेच बोगस मतदारांची घुसखोरी याचे पुरावेदेखील दिले. मात्र निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. आघाडीच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही अधिकाऱयांना देता आली नाहीत. उलट निवडणूक विभागाचे प्रवत्ते असल्यासारखे भाजपचे नेते आता बाईट देत होते, मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर दोषींवर कारवाई करण्याची मागणीदेखील केली असून त्यावर आता भाजपचे नेते काय बोलणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक आठवडय़ावर येऊन ठेपली असतानाही शहरातील मतदारांच्या याद्यांमधील गोंधळ अजूनही संपलेला नाही. यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱयांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची शहानिशा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज थेट अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यालयात जाऊन तेथील निवडणूक अधिकाऱयांसोबत चर्चा केली. काही इच्छुक उमेदवारांनी आपल्याला पाहिजे असलेली नावे मतदार याद्यांमध्ये वळवून घेतली असून काही नावे अन्य प्रभागामध्ये टाकण्यात आली आहेत, असा आरोप खुद्द चव्हाण यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, तातडीने उपाययोजना करा; शिवसेनेची मागणी मुंबईत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, तातडीने उपाययोजना करा; शिवसेनेची मागणी
पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढत असताना आता नॅशनल पार्कलगत असणाऱ्या मालाड पूर्व येथील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स...
समरजीत सिंग यांना अखेर डिस्चार्ज, ‘सामना’च्या दणक्यानंतर रुग्णालय प्रशासन नमले
इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग
बिग बॉस मराठी पुन्हा येतोय…
न्या. सूर्य कांत यांनी पदभार स्वीकारला
मतदार यादीत घोळ, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच कबुली
मतदार यादीत घोळ घालणाऱ्या निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! आदित्य ठाकरे यांची मागणी