Ratnagiri News – कौटुंबिक वादातून पत्नीला संपवले, मग भूताने हत्या केल्याचा बनाव; आरोपी पतीला जन्मठेप

Ratnagiri News – कौटुंबिक वादातून पत्नीला संपवले, मग भूताने हत्या केल्याचा बनाव; आरोपी पतीला जन्मठेप

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भूताने पत्नीची हत्या केल्याचा बनाव पतीने केला होता. मात्र पोलिसांनी सखोल तपास करत पतीचा बनाव उघडकीस आणला. यानंतर पतीला अटक करत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला. गजानन जगन्नाथ भोवड असे आरोपी पतीचे नाव आहे.

राजापूर तालुक्यातील परुळे-सुतारवाडी येथील रहिवासी गजानन भोवड याने आपली सिद्धी भोवड हिची 25 जून 2021 रोजी हत्या केली होती. भोवड कुटुंब 2019 कोविडच्या काळात परुळे येथील आपल्या गावी आले होते. पत्नी सिद्धी ही आरोपीला वेळेवर जेवण न देणे, मुलांकडे व्यवस्थित लक्ष न देणे तसेच त्याला आई-वडिलांवरुन शिवीगाळ करत होती. तसेच आरोपीचे अन्य स्त्रियांबरोबर संबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये भांडण होत असे. हा राग मनात धरून आरोपीने 25 जून दुपारी सिद्धीला तिच्या बहिणीकडे नेतो सांगून तिला परुळे-सुतारवाडी येथील जंगलमय-दलदलीच्या भागात नेले. तेथे तिचे नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारले. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत तेथील गवतात लपवून बायकोला भूताने मारले, असे गावकऱ्यांना आणि पोलिसांना सांगितले.

या घटनेचा तपास राजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मौळे करत होते. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला तपासात आरोपीने केलेला बनाव उघड झाला. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादवी कलम 302, 201, 177 अन्वेय गुन्हा दाखल करुन अटक केली. तपासअंती दोषारोपपत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने सोमवारी (10 नोव्हेंबर) खटल्याचा निकाल सुनावला.

सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी 14 साक्षीदार तपासले. त्यापैकी आरोपीची बहिण, मेहुणा, संरपंच हे महत्वाचे साक्षीदार फितूर झाले. मात्र केवळ परिस्थितीजन्य पुराव्यात डॉ. अजित पाटील, डॉ. विनोद चव्हाण, पंच सतीश शिंदे, मयत सिद्धी यांची बहिण-सोनाली शिंदे यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी आरोपीला या खटल्यात दोषी धरुन भादवी कलम 302 मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, भादवी कलम 201 पुरावा नष्ट करणे यासाठी तीन वर्षे कारावास 1 हजार रुपये दंड, तसेच भादवी कलम 177 खोटी खबर देणे यासाठी 500 रुपये दंड 15 दिवस साधा कारावास तसेच यातील दंडाच्या रक्कमेतील 5 हजार मयत सिद्धीच्या आईला देण्यात येतील असा आदेश दिला. या खटल्यात तपासिक अंमलदार म्हणून राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर आणि पैरवी म्हणून पोलीस शिपाई विकास खांदारे यांनी काम पाहिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली शक्यता दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली शक्यता
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. हा...
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी, सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था
लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट; आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, दिल्लीत हाय अलर्ट जारी
रत्नागिरी नगर परिषदेसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
Kolhapur News – मावळत्या सोनसळी किरणांचा श्री अंबाबाईला अभिषेक 
Ratnagiri News – कौटुंबिक वादातून पत्नीला संपवले, मग भूताने हत्या केल्याचा बनाव; आरोपी पतीला जन्मठेप
दापोलीत करवाढीचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी गुंडाळला; शिवसेनेच्या दणक्याचा परिणाम