‘कॉफी विथ करण’मध्ये विराट-अनुष्का नाही येत, करण जोहरने सांगितले कारण

‘कॉफी विथ करण’मध्ये विराट-अनुष्का नाही येत, करण जोहरने सांगितले कारण

करण जोहरचा फेमस टॉक शो कॉफि विथ करणमध्ये अनुष्काने उपस्थिती लावली मात्र ती आपला नवरा विराट कोहलीला घेऊ आलेली नाही. यावर आता करण जोहर यांनीच खुलासा केला आहे. आता या घटनेचा खुलासा खुद्द करण जोहरने केला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ‘कॉफी विथ करण’मध्ये कधीच सहभागी झालेले नाहीत. नुकताच करण जोहर सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.आता या घटनेचा खुलासा खुद्द करण जोहरने केला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा’कॉफी विथ करण’मध्ये कधीच सहभागी झालेले नाहीत.

करण जोहर सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. सानिया मिर्झाने आपल्या पॉडकास्टमध्ये करण जोहरला विचारले की, कोणत्या सेलिब्रिटींना तुम्ही तुमच्या शोमध्ये बोलावत आहात आणि ते नकार देत आहेत. त्यावर करण म्हणतो करण आणि बीर कपूर या आधीच्या सिझनमध्ये आले आहेत, मात्र गेले तीन सिझन त्याला शो साठी विचारतोय तर त्यावर तो नकार देतोय. कोणतं एक नाव जे आतापर्यंत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आले नाही. करण थोडा विचार करुन बोलणार इतक्यात सानियानेच म्हटलं की, विराट कोहली.

सानियाच्या या गोष्टीवरुन करण म्हणाला, की तो क्रिकेटरना त्याच्या शोमध्ये बोलावत नाही. त्याने हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यातील प्रकरणाचा संदर्भ देत म्हटले की त्या वादानंतर तो कोणत्याही क्रिकेटपटूंना आमंत्रित करत नाही आणि त्यांना कधीही विचारणार नाही. 2019 मध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला करण जोहरच्या शोमध्ये आल्यानंतर ट्रोलचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियावर त्यांना महिलांवरच्या कमेण्ट्समुळे त्यांना टिकेचा सामाना करावा लागला होता. त्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंनी माफी मागितली असली तरी, त्यांना ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातून निलंबित करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सूर्यनमस्कार करण्याच्या स्टेप्स कोणत्या? लगेच जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याच्या स्टेप्स कोणत्या? लगेच जाणून घ्या
तुम्ही रोज सूर्यनमस्कार घातले तर तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकतात. आता सूर्यनमस्काराचे 12 आसन कोणते आहेत, त्याचे काय फायदे आहेत,...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडणार; क्रीडा मंत्रालय उभारणार ‘स्पोर्ट्स सिटी’
छत्तीसगडमध्ये महिला माओवाद्याचे तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण
पारंपारिक शेतीऐवजी नवीन वाट स्विकारली, निवृत्त सैनीकाने केला हळद लागवडीचा अनोखा प्रयोग
तरुणीने ब्लॅकमेल केलं! दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला जीवे मारण्याची धमकी
पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणातील मारेकरी सुरक्षा रक्षकाच्या जन्मठेपेवर शिक्कामोर्तब; फाशी सुनावण्यास हायकोर्टाचा नकार
निळी साडी, मोकळे केस अन् मादक नजर; सोशल मीडियावर ट्रेंड होणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?