शूटिंगदरम्यान श्रद्धा कपूर जखमी
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही शूटिंगदरम्यान किरकोळ जखमी झाली आहे. श्रद्धा सध्या तिच्या आगामी ‘ईथा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नाशिकजवळील औंढेवाडी येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना श्रद्धाच्या डाव्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाले. एका डान्स स्टेपदरम्यान तिने तिचे सर्व वजन डाव्या पायावर ठेवले आणि तिचा तोल गेला, ज्यामुळे तिला दुखापत झाली. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना चित्रीकरण थांबवावे लागले. ‘ईथा’ हा चित्रपट प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि तमाशा कलाकार विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List