Nanded News – सरकारी कर्मचाऱ्याकडून आईचा प्रचार, कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्या विरोधात आयोगात तक्रार
धर्माबाद नगर परिषद निवडणुकीत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव वैभव कुलकर्णी हे सरकारी नोकरीत असतानाही आपल्या आईच्या प्रचारात सक्रिय आहेत. त्यांच्या आई अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.
वैभव कुलकर्णी यांनी उमरी येथे अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. ते उघडपणे प्रचार करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्याला प्रचारासाठी परवानगी आवश्यक असते. मात्र त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. तरीही निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करत नाहीत.
शिवसेनाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख मारोती कागेरू यांनी याची तक्रार केली. माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर यांनीही आवाज उठवला. दोघांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र तरी याची पण दखल घेतली गेली नाही.
आता याची थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वैभव कुलकर्णी यांचे निलंबन आणि आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात अली आहे. निवडणूक अधिकारी पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत मारोती कागेरू यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे बाहुले बनले का?” २२ नोव्हेंबर रोजी सुरेंद्र बेळकोणीकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धट उत्तर दिले. त्यांच्याविरुद्धही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List