लग्नसमारंभासाठी जात असताना कार नदीत कोसळली, तीन शिक्षकांचा मृत्यू

लग्नसमारंभासाठी जात असताना कार नदीत कोसळली, तीन शिक्षकांचा मृत्यू

लग्नासमारंभासाठी असतानाच कार अनियंत्रित झाल्याने नदीत पडली. या अपघातात तीन शिक्षकांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. घटनास्थळावरील उपस्थितांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस आणि एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.

उत्तराखंडमधील रातीभाटजवळ शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. सर्व शिक्षक अल्मोडाहून हल्दानी येथे लग्नाला चालले होते. सुरेंद्र भंडारी, पुष्कर भैसोडा आणि संजय बिष्ट अशी मयत शिक्षकांची नावे आहेत. मनोज कुमार असे जखमी शिक्षकाचे नाव असून त्याला उपचारासाठी प्राथमिक उपचारानंतर हल्दानीतील हायर सेंटरमध्ये रेफर करण्यात आले आहे.

रातीघाट येथील वळणावर कार अनियंत्रित झाली आणि शिप्रा नदीत पडली. अंधार आणि नदीची खोली यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. अथक प्रयत्नांनी एसडीआरएफ पथकाने कारमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. चौघांना रुग्णालयात नेले असता सुरेंद्र, पुष्कर आणि संजय यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर मनोज यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन उमरटी’, मध्य प्रदेशात शस्त्र बनवणाऱ्या भट्ट्या उद्ध्वस्त; 36 ताब्यात पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन उमरटी’, मध्य प्रदेशात शस्त्र बनवणाऱ्या भट्ट्या उद्ध्वस्त; 36 ताब्यात
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटीमध्ये ऑपरेशन राबविले. तब्बल 105 अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारून शस्त्र बनवणाऱ्या 50 भट्ट्या उद्ध्वस्त केल्या....
कागल नगरपरिषद निवडणूक – मंत्री मुश्रीफ-मंडलिकांमध्ये जुंपली; कार्यकर्ते सैरभैर
चेंडू शोधायला गेले अन् झाडीत सापडली स्फोटकं; सरकारी शाळेजवळून जिलेटिनच्या 161 कांड्या जप्त, सुरक्षा यंत्रणा अलर्ट
असं झालं तर… फ्लाईट मिस झाली तर…
लग्नसमारंभासाठी जात असताना कार नदीत कोसळली, तीन शिक्षकांचा मृत्यू
पिंपरीतील मतदारयादीत घोळात-घोळ !
पुन्हा दिसले कोयते… बंदुकधारी कुठे आहेत?