मी आता हा ताण सहन करू शकत नाही; पश्चिम बंगालमध्ये आणखी एका BLO ने कामाच्या दबावामुळे जीवन संपवले

मी आता हा ताण सहन करू शकत नाही; पश्चिम बंगालमध्ये आणखी एका BLO ने कामाच्या दबावामुळे जीवन संपवले

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका बूथ लेव्हल ऑफिसरने (BLO) कामाच्या अतिताणामुळे जीवन संपवले आहे. मृत महिला BLO कृष्णनगरच्या शास्तीतला भागातील रहिवासी आहे. त्या छपरा पोलीस ठाणे परिसरातील बंगालझी परिसरातील बूथ क्रमांक २०२ ​​वर बीएलओ म्हणून तैनात होत्या. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील बीएलओ रिंकू तरफदार यांनी कथित प्रशासकीय दबावामुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. रिंकू यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, मी आता हा ताण सहन करू शकत नाही. त्या BLO चा कठीण, किचकट आणि ऑनलाइन कामाचा ताण सहन करू शकत नव्हत्या, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, रिंकू तरफदार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या मृत्यूसाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय दबावाला जबाबदार धरले आहे. कुटुंबियांचा दावा आहे की, व्यवसायाने पॅरा-शिक्षक असूनही, त्यांना कोणत्याही सवलती नाकारण्यात आल्या आणि BLO च्या कामाचा मोठा भार तिच्यावर होता. त्यांनी त्यांचे ९० टक्के काम पूर्ण करूनही ऑनलाइन कामाचाही त्यांच्यावर दबाव होता. तो दबाव आणि ताण असह्य झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

सुसाइड नोटमध्ये रिंकू यांनी लिहिले आहे की, मी आता हा दबाव सहन करू शकत नाही. मला अतिताणाने स्ट्रोक येण्याचा धोका आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्या रात्री ११ वाजेपर्यंत सामान्य होत्या. त्या सकाळी काम करत असतना अचानक खाली कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. एका सामान्य गृहिणी आणि पॅराएज्युकेटरवर एवढी मोठी जबाबदारी टाकणे कितपत योग्य आहे? एखाद्या व्यक्तीला किती काम करावे लागते हे उच्च अधिकाऱ्यांना का समजत नाही? असे सवाल कुटुंबियांनी केले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

गेल्या काही दिवसांत अनेक राज्यांमधून बीएलओंच्या मृत्यू आणि आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम बंगाल व्यतिरिक्त, गुजरात, तामिळनाडू आणि केरळमध्येही बीएलओंचा मृत्यू झाला आहे. नादिया जिल्ह्यातील अलिकडच्या घटनेसह, कामाच्या ताणामुळे नऊ बीएलओंना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अखिलेश यादव यांनी दावा...
Photo – भाजपला धक्का! डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
चीनची कॉकरोच कॉफी चर्चेत, करपट आंबट चवीची तरुणाईला भुरळ
शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही – संजय राऊत
Ratnagiri News – सततच्या पावसामुळे सुपारी फळाला फटका; नुकसानीच्या पंचनाम्यांचा प्रशासनाला विसर
दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मी आता हा ताण सहन करू शकत नाही; पश्चिम बंगालमध्ये आणखी एका BLO ने कामाच्या दबावामुळे जीवन संपवले