टाटा लिस्ट फेस्टमध्ये जेरी पिंटो यांचे ‘अ गुड लाईफ’ प्रकाशित

टाटा लिस्ट फेस्टमध्ये जेरी पिंटो यांचे ‘अ गुड लाईफ’ प्रकाशित

मुंबईच्या इंग्रजी साहित्य वर्तुळातील लेखक जेरी पिंटो यांचा स्वतचा खास वाचकवर्ग आहे. त्यांचे बहुतांश लेखन हे मुंबईचं जगणं, इथलं समाजीवन आणि मुंबईचा खरा चेहरा मांडणारे आहे. ललित लेखन आणि कथा, कादंबरी स्वरूपातील त्यांच्या लेखनातून मुंबईची खरी ओळख वाचकांसमोर ते उलगडतात. संवेदनशील लेखक आणि कवी असणार्या जेरी पिंटो हे मराठी साहित्याचे भाषांतर करणारे एक महत्त्वाचे अनुवादक म्हणून ओळखले जातात. मुंबईतील एका गोवन ख्रिश्चन कुटुंबाची कथा सांगणारी त्यांची कादंबरी ‘एम अँड द बिग हूम’ ही मराठीमध्ये ‘एम आणि हुमराव’या नावाने प्रसिद्ध झाली आहे. दरवर्षी मुंबईत होणारा टाटा लिस्ट फेस्ट हा इंग्रजी वाचकांची साहित्यिक भूक शमवणारा ठरतो. यावर्षी खासदार शशी थरूर आणि माजी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांच्या चर्चात्मक कार्यक्रम व पुस्तक प्रकाशनाला अभूतपूर्व गर्दी लाभली. याच लिटफेस्टमध्ये जेरी पिंटो यांचे ‘अ गुड लाईफ’ हे पुस्तकही प्रकाशित झाले. खर्या अर्थाने स्टोरीटेलर ही त्यांची ओळख या पुस्तकातून व्यक्त होते. पॅलिएटिव्ह केअर हा विषय मांडत रुग्णांची सेवा करणारे केअरगिव्हर यांच्या आयुष्यातील कथाव्यथा मांडणारे हे कथाविषयक पुस्तक आहे. जेरी पिंटो हे वाचकांना आवडणार्या यादीतील लेखक असल्याने पुस्तक सर्वदूर पोहोचेल यात शंका नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News