दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेने वापरात नसलेले भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या भूखंडाचा लिलाव करून भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आता वरळीतील महापालिकेच्या क्रीडा भवनासाठीची जागाही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच असल्याचा जबरदस्त टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्सवर पोस्ट शेअर करून सरकारच्या या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ”दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! ह्याचचं उदाहरण आता वरळीत दिसतंय. वरळीकरांसाठी क्रिडाभवन उभारणीसाठीची राखीव जागा आता विकायला काढलीय. निवडणूक होण्याच्या आधीच महापालिका भीकेला आणायची, मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं; हेच तर कारनामे या सरकारचे आहेत!

इतर वेळी एकमेकांसोबत भांडतात, कॅबिनेटवर बहिष्कार टाकतात पण भ्रष्टाचार करायच्या वेळी आणि त्याची क्लीन चिट द्यायला सगळ्यांची काय एकी आहे बघा!, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अखिलेश यादव यांनी दावा...
Photo – भाजपला धक्का! डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
चीनची कॉकरोच कॉफी चर्चेत, करपट आंबट चवीची तरुणाईला भुरळ
शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही – संजय राऊत
Ratnagiri News – सततच्या पावसामुळे सुपारी फळाला फटका; नुकसानीच्या पंचनाम्यांचा प्रशासनाला विसर
दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मी आता हा ताण सहन करू शकत नाही; पश्चिम बंगालमध्ये आणखी एका BLO ने कामाच्या दबावामुळे जीवन संपवले