Bihar election result 2025 – बिहारमध्ये चाललंय काय? राजदला मतं जास्त, पण जागा कमी; भाजप-जेडीयूला मतं कमी, पण जागा जास्त

Bihar election result 2025 – बिहारमध्ये चाललंय काय? राजदला मतं जास्त, पण जागा कमी; भाजप-जेडीयूला मतं कमी, पण जागा जास्त

बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून दुपारपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एनडीएची गाडी सुसाट असून भाजप 87, तर जेडीयू 75 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या आरजेडीची पिछेहाट झाली आहे. आरजेडी सध्या 35 जागांवर आघाडीवर आहे. अर्थात असे असले तरी मतांच्या टक्केवारीत आरजेडी वर आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार (दुपारी 12 वाजेपर्यंत) आरजेडीला 23.05 टक्के मतं मिळाली आहेत. तर भाजपला 21.46 टक्के मतं मिळाली आहेत. तर जेडीयूला 19.04 टक्के मतं मिळाली आहेत. आरजेडीपेक्षा भाजप आणि जेडीयूला कमी मतं मिळाली असली तरी जागा मात्र जवळपास अडीच पट मिळाल्या आहेत.

Bihar Election Result 2025 – लालटेन शाम को जलता है… निकालावर तेजस्वी यादव यांची सूचक पोस्ट

लोक जनशक्ति पार्टीला (रामविलास) 5.33 टक्के मतं मिळाली असून हा पक्ष 21 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला 8.17 टक्के मतं मिळाली आहे. मात्र काँग्रेस फक्त 5 जागांवर आघाडीवर आहे. एमआयआयला 1.81 टक्के, बसपाला 1.48 टक्के, सीपीआयला (एमएल) (एल) 3.19 टक्के, तर नोटाला 1.84 टक्के मतं पडली आहेत. अर्थात बिहारमध्ये अद्यापही मतमोजणी सुरू असल्याने या आकडेवारीमध्ये सायंकाळपर्यंत बदल होण्याचीही शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोग्यासाठी हा पांढरा पदार्थ आहे उत्तम पर्याय, निरोगी हृद्यासाठी सर्वोत्तम आरोग्यासाठी हा पांढरा पदार्थ आहे उत्तम पर्याय, निरोगी हृद्यासाठी सर्वोत्तम
सध्याच्या घडीला मखाना हा आरोग्यदायी पर्याय म्हणून अनेकांकडून सेवन केला जात आहे. मखाना हा एक अतिशय आरोग्यदायी नाश्ता म्हणून ओळखला...
मधुमेहींसाठी संजीवनी आहेत हे सुपरफूड्स, जाणून घ्या
हिवाळ्यात चाकवत खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
बिहार निवडणूक निकालावर संजय राऊत यांचं ट्विट, एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
माझ्या मुलाने ते फोटो पाहिले तर… गिरीजा ओक स्पष्टच बोलली
प्रसिद्ध वृत्तपत्रात बातमी ऐवजी छापला ‘Prompt’, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Bihar election result 2025 – बिहारमध्ये चाललंय काय? राजदला मतं जास्त, पण जागा कमी; भाजप-जेडीयूला मतं कमी, पण जागा जास्त