बिग बींनी सुनावले पापाराझींना खडे बोल.. नेमकं काय घडलं? वाचा
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून घरी आले असून सध्या घरातच त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात असल्यापासून त्यांच्यांबाबतचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांची प्रकृती बिघडल्यापासून त्यांच्या घराबाहेर, रुग्णालयाबाहेर पापाराझी ठाण मांडून बसले होते. मीडियाच्या या कृतींमुळे अनेक सेलिब्रिटी संतापले आहेत.
धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल यानेही पपाराझींवर चांगलाच संताप व्यक्त केला होता. यानंतर आता बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनीही पपाराझींना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
T 5564 – no ethics .. कोई भी अचार-नीति नहीं
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 14, 2025
नेहमीप्रमाणेच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी X वर लिहिले, “नो एथिक्स… वागण्यात कुठलीही नैतिकता नाही.” असे म्हणत अमिताभ यांनी पपाराझींना संबोधले आहे.
बच्चन यांनी केलेली ही पोस्ट त्यामुळे सध्याच्या घडीला चर्चेचा विषय बनली आहे. बच्चन यांच्या पोस्टचा धर्मेंद्र यांच्याशी संदर्भ लावला जात आहे. धर्मेंद्र यांच्या बातमीबाबत मीडियाने केलेल्या उथळपणामुळे सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळत आहे. त्यात आता बिग बी यांनी सुद्धा मीडियाचे सभ्य भाषेत कान टोचले आहेत.
सर्व देवाच्या हातात आहे! धर्मेंद्र रुग्णालयातून परतल्यानंतर हेमामालिनी यांची पहिली प्रतिक्रीया
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List