कामगारांची फसवणूक करण्याचा भाजपचा डाव उधळला, ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये शिवसैनिकांचे जोरदार आंदोलन

कामगारांची फसवणूक करण्याचा भाजपचा डाव उधळला, ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये शिवसैनिकांचे जोरदार आंदोलन

वांद्रे पश्चिम येथील ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांची फसवणूक करण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आज शिवसैनिकांनी उधळून लावला. हॉटेलबाहेर जोरदार आंदोलन करून शिवसैनिकांनी भाजपधार्जिण्या व्यवस्थापनाला हादरवून सोडले. भारतीय कामगार सेनेचे सदस्य असलेल्या शिवसेनेच्या कामगारांना जबरदस्तीने, दादागिरीने भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिल्याने व्यवस्थापनाचे धाबे दणाणले.

ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय कामगार सेनेची मान्यताप्राप्त युनियन कार्यरत आहे. भारतीय कामगार सेना युनियनचा बोर्डही हॉटेलबाहेर आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने आपला झेंडा आणि अखिल भारतीय कर्मचारी संघ या भाजपप्रणीत युनियनचा बोर्ड थेट हॉटेलच्या आत लावला. इतकेच नव्हे तर, व्यवस्थापनाच्या माध्यमातून कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देऊन जबरदस्तीने भाजप युनियनच्या सदस्य अर्जांवर त्यांच्या सह्या घेतल्या. ही बाब कानावर येताच आज शिवसैनिकांनी शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हॉटेलवर धडक देत जोरदार आंदोलन करून परिसर दणाणून सोडला.

भारतीय कामगार सेनेची युनियन सेवा क्षेत्रात सक्रिय आहे. आतापर्यंत युनियनने कधीच कुणाला त्रास दिला नाही; पण या सहकार्याच्या धोरणाचा गैरफायदा व्यवस्थापने घेऊ लागली आहेत. आताच आलेल्या भाजपच्या युनियनला सदस्य मिळवून देण्यासाठी भारतीय कामगार सेनेच्या सदस्य कर्मचाऱयांवर दबाव आणला जात आहे. कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोप यावेळी अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

या आंदोलनात शिवसेना आमदार हारुन खान, भारतीय कामगार सेना चिटणीस मनोज धुमाळ, जीवन कामत, हरी शास्त्राr, संतोष कदम, संजय कदम, माजी नगरसेवक सदा परब आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महापालिका जिंकता येणार नाही म्हणून त्रास देताहेत

भारतीय कामगार सेना कामगारांच्या या प्रलंबित प्रश्नासाठी लढतेय म्हणून ती युनियनच बाहेर काढण्याचा डाव व्यवस्थापनाने रचला आहे; पण केवळ भाजपा सत्तेत आहे, पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत म्हणून जोरजबरदस्ती करून युनियन काढून टाकली जाऊ शकत नाही, असा इशारा अनिल परब यांनी दिला. भारतीय कामगार सेनेची युनियन कित्येक वर्षे असूनही हॉटेलच्या आतमध्ये बोर्ड लावू दिला नाही. आता भाजपच्या युनियनला पायघडय़ा का घातल्या जाताहेत, असा संतप्त सवाल त्यांनी केला. महापालिका जिंकता येत नाही म्हणून शिवसेनेच्या युनियनना त्रास दिला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शिवसैनिकांना अडवाल तर घरात घुसू – अनिल परब

अनिल परब आणि शिष्टमंडळाने काही वेळानंतर हॉटेलचे महाव्यवस्थापक अविकेत यांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकाराबाबत कडक शब्दांत जाब विचारला. यावेळी एचआर व्यवस्थापक मनोज कारेकर हेसुद्धा उपस्थित होते. ‘कामगारांवर जबरदस्ती करणाऱया तुमच्या चमच्यांना समजवा. त्या सर्वांच्या घरचे पत्ते माझ्याकडे आहेत आणि व्यवस्थापनाच्या अधिकाऱयांच्या घरचे पत्तेही माझ्याकडे आहेत. इथे रोखाल, तुमच्या घरी यायला कोण रोखणार? उद्या रात्री तुमच्या घरी येणार मी’ असे अनिल परब यांनी बजावले. कामगार आमच्याकडे राहणार नसतील तर आम्ही अडवणार नाही; पण जबरदस्तीने, दादागिरीने कामगारांना भारतीय कामगार सेना सोडायला लावलात तर याद राखा, मॅटर सेटल झाल्याचा रिपोर्ट मला उद्या आला पाहिजे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत व टीम उद्या येईल. त्यांची भेट घ्या. आज रात्री दबावापोटी काही केलेत तर याद राखा. लग्नाचा सीझन चालू आहे, असा इशारा अनिल परब यांनी देताच अविकेत यांना घाम फुटला.

भाजप सत्तेत आहे म्हणून माज आलाय का?

शिवसेना नेते अनिल परब यांनी यासंदर्भात व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटकाव केला. व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काहीच लोकांनी जावे असे पोलिसांनी सांगितले. त्याला अनिल परब यांनी विरोध केला. माझ्यासोबत किमान 25 लोकांना मी चहा पिण्यासाठी आतमध्ये घेऊन जाणार आहे तुम्हाला काय हरकत आहे, असे सांगतानाच, भाजपवाले सत्तेत आहेत म्हणून व्यवस्थापनाला इतका माज आलाय का, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जैन बोर्डिंगचे खरेदीखत अखेर न्यायालयात रद्द जैन बोर्डिंगचे खरेदीखत अखेर न्यायालयात रद्द
शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदी खत अखेर कायदेशीररीत्या रद्द करण्यास पुणे दिवाणी न्यायालयात शिक्कामोर्तब झाले. दि. 8...
असं झालं तर… गाडीचा ब्रेक फेल झाला तर…
शास्त्रज्ञाची लेक ते आघाडीची अभिनेत्री
ज्येष्ठ पर्यावरणवादी, ’पद्मश्री’ थिम्मक्का यांचे निधन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात बेवारस लाल बॅगमुळे घबराट, पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाची धावाधाव
प्रशांत दामले @13,333! विक्रमी प्रयोगानिमित्त 21 नोव्हेंबरला विलेपार्ल्यात होणार भव्य सत्कार
धर्मेंद्र यांचा आयसीयूतील व्हिडीओ लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक