हिवाळ्यात आहारामध्ये कोथिंबीर सर्वाधिक समाविष्ट करणे का गरजेचे आहे, जाणून घ्या
कोथिंबीर आपल्या किचनमधील महत्त्वाची भाजी.. कोथिंबीर अन्नाची चव तर वाढवतेच. त्याशिवाय, आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानली जाते. हिवाळ्यात लोकांना ते का आवडते आणि त्याचे मुख्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
वारंवार पोटफुगीचा त्रास होत असल्यास करुन बघा हे घरगुती उपाय, वाचा
हिवाळ्यात कोथिंबीराचा वापर कसा कराल?
हिवाळ्यात ताज्या कोथिंबीरीपासून भाज्या, सॅलड, चटण्या आणि पराठ्यांमध्ये वापरु शकतो.
कोथिंबीर खाण्याचे फायदे
हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय कराल, वाचा
कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे हिवाळ्यात होणऱ्या हंगामी आजारांपासून (सर्दी आणि खोकला) संरक्षण होते.
कोथिंबीरीमध्ये फायबरचे प्रमाण अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी करते आणि चयापचय सुधारते.
कोथिंबीरीत अशी संयुगे असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते.
कोथिंबीर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करते, हृदयरोगाचा धोका कमी करते.
कोथिंबीरीमध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असतात, जे वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.
कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
चटणी बनवून, भाज्यांमध्ये, पराठ्यात किंवा सॅलडमध्ये आपण कोथिंबीराचा वापर करु शकतो. म्हणूनच या हिवाळ्याच्या हंगामात कोथिंबीरीचा आहारात समावेश करणे खूप गरजेचे असते. अन्नाची चव वाढवण्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी कोथिंबीर वरदानापेक्षा कमी नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List