थंडीच्या दिवसात नाश्त्यासाठी झटपट होणारा मुळ्याचा पराठा
थंडीच्या दिवसात मुळा खाणे हे खूप फायदेशीर मानले जाते. मुळ्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणूनच बहुतेक घरांमध्ये थंडीत मुळ्याचे विविध प्रकार केले जातात. त्यातीलच सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मुळ्याचा पराठा. मुळ्याचा पराठा हा नाश्त्याला खाल्ल्यामुळे पोटभरीसाठी उत्तम मानले जाते. एक मुळ्याचा पराठा खाल्ला तरी लवकर भूक लागत नाही. म्हणूनच नाश्त्यामध्ये मुळ्याचा पराठा हा केला जातो.
मुळ्याचा पराठा कसा बनवाल?
साहित्य:
मुळा – १ (किसलेला)
आले – १/२ इंच (किसलेले)
हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेले)
चिरलेली कोथिंबीर
ओवा – १/२ चमचा
मीठ – चवीनुसार
गव्हाचे पीठ – पराठा बनवण्यासाठी
तेल/तूप – भाजण्यासाठी किंवा तळण्यासाठी
प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपल्या आहारात एक वाटी हा पदार्थ असायलाच हवा, वाचा
कृती
मुळा किसून घ्या, मीठ घाला आणि १० मिनिटे तसेच राहू द्या, नंतर पाणी पिळून घ्या.
या पाण्याने पीठ मळून घ्या.
मुळ्यामध्ये आले, हिरव्या मिरच्या, धणे आणि ओवा घाला.
पीठ एका गोळ्यात भरा आणि ते लाटून घ्या.
तळण्यासाठी तूप/तेल लावावे आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत पराठा भाजून घ्यावा.
हा गरमागरम पराठा लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करु शकता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List