गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कलाक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो. शाहीर विठ्ठल उमप यांच्या १५व्या स्मृतीदिनानिमित्त १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा बुधवार २६ नोव्हेंबरला रवींद्र नाट्यमंदिर येथे सायं. ६.०० वा. संपन्न होणार आहे.
यंदाच्या ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ गझलनवाझ भीमराव पांचाळे (जीवनगौरव), शाहीर राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र), प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), परेश मोकाशी (दिग्दर्शक), मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व लोकशाहीर विठ्ठल उमपांची प्रतिकृती असलेले सुरेख मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List