Bihar Election Result 2025: मोठ्या पिछाडीनंतरही तेजस्वी यादव यांच्या RJD ला BJP, JDU पेक्षा जास्त मते

Bihar Election Result 2025: मोठ्या पिछाडीनंतरही तेजस्वी यादव यांच्या RJD ला BJP, JDU पेक्षा जास्त मते

बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सत्ता कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाला (RJD), ज्याला २०१० नंतरचा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी त्यांना दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे तो म्हणजे सर्वाधिक मतांचा वाटा.

मतमोजणी सुरू होऊन सहा तास उलटल्यानंतर, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला त्यांचे प्रतिस्पर्धी सध्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

२४३ सदस्यांच्या विधानसभेत १४३ जागांवर निवडणूक लढवलेल्या आरजेडीने आतापर्यंत २२.८४ टक्के मते मिळवली आहेत, जी भाजपपेक्षा १.८६ टक्के आणि जेडीयूपेक्षा ३.९७ टक्के जास्त आहेत.

निवडणूक निकालातील ठळक मुद्दे:

आरजेडीची स्थिती: २०२० च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या आरजेडीला सध्या केवळ २७ जागांवर आघाडी मिळाली आहे. २०१० मध्ये आरजेडीला फक्त २२ जागा मिळाल्या होत्या; त्यानंतरचा हा आरजेडीची बिहार निवडणुकीतील ही दुसरी खराब कामगिरी ठरली आहे.

तेजस्वी यादव पिछाडीवर: विरोधी पक्षाचे महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे देखील त्यांच्या राघोपूर मतदारसंघात सध्या मागे पडले आहेत. त्यांना आतापर्यंत ३३,३४७ मते मिळाली असून, ते भाजपचे सतीश कुमार यांच्यापेक्षा २,२८८ मतांनी पिछाडीवर आहेत.

महागठबंधनच्या मित्रपक्षांची कामगिरी: विरोधी आघाडी महागठबंधनमधील आरजेडीचे मित्रपक्षही खूप मागे आहेत. काँग्रेसला चार, सीपीआयएम (एल) लिबरेशनला चार आणि सीपीआयला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.

एनडीएची स्थिती:

दुसरीकडे, एनडीए सध्या २०१ जागांवर आघाडीवर आहे, ज्यात भाजप ९१, जेडीयू ८१, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) २१, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा पाच आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला चार जागांवर आघाडी मिळाली आहे.

प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील जन सुराज पार्टी आणि मुकेश सहानी यांच्या विकासशील इन्सान पार्टी (VIP) यांनी लढवलेल्या सर्व जागांवर ते पिछाडीवर आहेत.

मतदान आकडेवारी:

बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले होते – ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर.

या निवडणुकीत ६६ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, जे १९५१ नंतरचे राज्यातील सर्वाधिक मतदान आहे.

पुरुष मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी ६२.८ टक्के होती, तर महिला मतदारांमध्ये ती ७१.६ टक्के होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात तुम्ही कधी खजूरगुळाच्या पाकातील रसगुल्ला खाल्ला आहे का? जाणून घ्या झटपट रेसिपी हिवाळ्यात तुम्ही कधी खजूरगुळाच्या पाकातील रसगुल्ला खाल्ला आहे का? जाणून घ्या झटपट रेसिपी
हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला उबदारपणा आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी आहारात अनेक वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करत असतो. तसेच थंडीच्या...
पांढरा राइस की ब्राऊन राइस… डायबिटीजचे रुग्ण कोणता भात खाऊ शकतात? अन् कोणत्या भातामुळे शुगर वाढू शकते?
90 टक्के लोकांना माहिती नाही, शरीराच्या कोणत्या भागाला थंडी जास्त वाजते? जाणून घ्या
हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
चेन्नईजवळ हिंदुस्थानी हवाई दलाचं विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान झाला अपघात
वैभव सूर्यवंशीची आग ओकणारी फलंदाजी! 32 चेंडूत ठोकलं शतक, पाकिस्तानची धडधड वाढली
बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमारांचे, मतचोरी व SIR मुळे एनडीएचा विजय – हर्षवर्धन सपकाळ