हिवाळ्यात चाकवत खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
हिवाळा सुरू होताच, बथुआ बाजारात उपलब्ध होतो. म्हणून या पालेभाजीपासून चविष्ट असे पदार्थ करु शकतो. चाकवत हा केवळ जिभेच्या चोचल्यांसाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठीही तितकाच महत्त्वाचा मानला जातो.
खासकरुन हिवाळ्यात चाकवत मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. चाकवतमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फरस असते.
हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय कराल, वाचा
चाकवतच्या भाजीत कॅलरीज कमी (\(100\) ग्रॅममध्ये फक्त \(43\) कॅलरीज) आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
फायबरच्या उच्च प्रमाणामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्या कमी होतात. हे आतड्यांमधील घाण साफ करण्यास मदत करते.
चाकवतच्या भाजीमध्ये रक्त शुद्ध करणारे घटक असतात. यामुळे शरीरातील अशुद्ध तत्वे बाहेर पडण्यास मदत होते.
प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपल्या आहारात एक वाटी हा पदार्थ असायलाच हवा, वाचा
चाकवतमध्ये असलेले अमीनो ऍसिड शरीरातील पेशींची निर्मिती, दुरुस्ती आणि त्यांची झीज भरून काढण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
चाकवतामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारख्या खनिजांमुळे हाडे आणि सांधे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळेच हाडांच्या बळकटीसाठी चाकवत हा खूप महत्त्वाचा मानला जातो.
चाकवतमध्ये पाण्याचे प्रमाणाही मुबलक असते. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
चाकवताचा रस हा यकृतासाठी खूप फायदेशीर मानला जातो. रोज या भाजीचा रस प्यायल्यास यकृत निरोगी राहते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List