रामदेव बाबा यांनी सांगितले बाजरीची भाकरी कशी खावी, मिळतील दुप्पट फायदे
हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर मानले जाते. बाजरी शरीराला उष्ण राखण्यासोबत ताकदही देते. यामुळे आयुर्वेदात बाजरी आरोग्यासाठी चांगली मानली जाते. राजस्थानासह देशातील अनेक ग्रामीण खेड्यात लोण्यासोबत बाजरी खातात. लसूण चटणी सोबत ती आणखी चांगली लागते. बाजरीचे पिठ थंडीत सुपरफूड मानले जाते. यामुळे पंतजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी अनेकदा बाजरीचे महत्व सांगितलेले आहे. आयुर्वेदानुसार बाजरी शरीराला अनेक पद्धतीने फायदे पोहचवते.
चला तर पाहूयात बाबा रामदेव यांच्या मते थंडीत कशा प्रकारे बाजरीची भाकरी खावी, तसेच जर चुकीच्या पद्धतीने बाजरी खाली तर काय नुकसान होते हे देखील पाहूयात..
बाजरीचे तत्व
बाजरी शरीरासाठी मोठे वरदान आहे कारण यात अनेक पोषक तत्व आहेत. कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, फॅट, कॅल्शियम, आर्यन, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, विटामिन बी1, बी2, बी3 आणि फोलेट देखील असते.
बाजरी गहू पेक्षा चांगली । Bajra vs Wheat roti
बहुतांशी भारतीय लोक रोज गव्हाच्या चपात्या आणि भात खातात. जयपूरच्या आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांनी सांगितले आहे की गव्हाची चपाती काही नुकसान पोहचवत नसली तरी ती फायदेही पोहचवत नाही. तर बाजरीच्या पिठात खूप फायबर असते. त्यामुळे ती पोटाचे आरोग्य चांगले राखते. चला तर रामदेव बाबा यांनी बाजरीचे काय फायदे सांगितले आहेत हे पाहूयात.
काय म्हणतात रामदेव बाबा ?
रामदेव बाबा यांनी एका व्हिडीओ सांगितले की बाजरीच्या पिठात नाचणीचे पिठ टाकून खाल्ले तर दुप्पट फायदा मिळतो. त्यांच्या मते जर कोणाला अर्थरायटिस किंवा लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर त्यांनी बाजरीत नाचणीचे पिठ मिक्स करुन खावे. त्यामुळे दोन्ही मिलेट्सची भाकरी मऊ होईल.बाजरी आणि नाचणीच्या भाकरी स्वतंत्रपणे तयार केल्या तर कडक होतात. त्यामुळे मिक्स करुन केल्या तर मऊ भाकरी होतात आणि चवही चांगली लागते. रागी आणि बाजरीत स्टार्च कमी असतो. आणि नैसर्गिक साखर असते. त्यामुळे वात कमी करणे आणि वजन कमी करण्यास ती उपयोगी आहे.
रागी आणि बाजरीच्या भाकरी सोबत एलोवेरा, मोड आलेली मेथी आणि कच्ची हळदीची भाजी खाण्याचा सल्ला रामदेव बाबांनी दिला आहे. त्यांनी यास तयार करण्याची पद्धत देखील सांगितली आहे. त्यांच्या मते तुम्ही २०० ग्रॅम एलोवेरा जेल,२० ग्रॅम मोड आलेली मेथी आणि १० ग्रॅम कच्ची हळद घ्या. याची भाजी बनवून बाजरी-नाचणीच्या भाकरी सोबत खा. या डीशला खाल्ल्यानंतर ९९ टक्के लोकांचा अर्थरायटीसची तक्रार संपली आहे.
औषधाचे काम करते एलोवेरा
रामदेव बाबा यांनी व्हिडीओत एलोवेराला रामबाण म्हटले आहे. रामदेव बाबा यांच्या मते मॅक्सिकन लोकही एलोवेराला शुगर, अर्थरायटीस आणि पोटाच्या तक्रारीसाठी युज करतात. भारतात हे रोपटे शतकानुशतके औषधी उपचारासाठी वापरले जाते. याची भाजी बनवून खाता येते. याशिवाय बाबा रामदेव यांनी घरात एलोव्हेरा आणि तुळशीचे झाड लावण्याचा सल्लाही दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List