शुभमन गिलनं मौन सोडलं अन् मोहम्मद शमीच्या कारकिर्दीला मिळाला फुलस्टॉप? परतीचे मार्ग बंद झाल्याची चर्चा
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. त्याला हिंदुस्थानच्या कसोटी आणि वन डे संघातही स्थान मिळालेले नाही. आता हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठीही त्याच्या नावाचा विचार झाला नाही. याबाबत आता कर्णधार शुभमन गिल याने भाष्य केले असून त्याने केलेल्या विधानामुळे शमीच्या कारकिर्दीला कायमचाच फुलस्टॉप लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात शुक्रवारपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या लढतीआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार शुभमन गिल याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कसोटी संघात स्थान का मिळत नाही याचे उत्तर दिले.
मोहम्मद शमीसारखी क्वालिटी असणारे गोलंदाज जास्त नाहीत. परंतु आम्ही आकाशदीप आणि प्रसिध कृष्णा सारख्या खेळाडूंच्या कामगिरीकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. बुमराह आणि सिराजही चांगली कामगिरी करत आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट आम्ही पुढची मालिका कुठे खेळणार आहोत आणि शमी संघात का नाही याचे चांगले उत्तर निवडकर्तेच देऊ शकतील, असे गिल म्हणाला.
बातमी अपडेट होत आहे…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List