पुलावरील गर्डरच्या कामासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दिवसातील 10 तास बंद राहणार
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथील पुलावर गर्डर घालण्याचे काम 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान संगमेश्वर येथील महामार्गावरील वाहतूक दिवसातून तीन टप्प्यात 24 तासांपैकी 10 तास थांबवण्यात येणार आहे. हलक्या वजनाच्या वाहनांची वाहतूक शास्त्री पुल डिंगणी मार्गे वळवण्यात येणार आहे. अवजड वजनांची वाहतूक थांबवण्यात येणार आहे.
संगमेश्वर येथील पुलावरील गर्डरच्या कामासाठी महामार्गावरील वाहतूक तीन टप्प्यात थांबवण्यात येणार आहे. त्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, संध्याकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत आणि रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत संगमेश्वर येथील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक बंद ठेवण्याबाबतचे काही फलक महामार्गावर लावण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List