बांग्लादेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, पाच ठिकाणी स्फोट; 17 बस जाळल्या

बांग्लादेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, पाच ठिकाणी स्फोट; 17 बस जाळल्या

आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी बांग्लादेशातील युनुस सरकारविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले आहे. ढाका लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आंदोलनात आतापर्यंत 17 बसेस जाळल्या गेल्याची माहिती मिळाली आहे. ढाकामधील 5 ठिकाणी स्फोट झाल्याच्याही बातम्या आहेत. आवामी लीगच्या हिंसक आंदोलनामुळे ढाका आणि मेमनसिंहसारख्या मोठ्या शहरांमध्ये सैन्याची तैनाती करण्यात आली आहे.

गुरुवारी आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम कमालपूर स्टेशन आणि गोपालगंज पीडब्ल्यूडी कार्यालयाबाहेर आग लावली. या आगीत कार्यकर्त्यांनी दोन बसेस जाळल्या.

आज बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पहिला निकाल लागणार आहे. आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना भीती आहे की या निकालात हसीना यांना दोषी ठरवले जाईल, ज्यामुळे त्यांच्या बांग्लादेशात पुनरागमनाची शक्यता अत्यंत कमी होईल.

बांग्लादेश सरकारच्या मते, हसीना यांच्या आदेशावरून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला होता. या प्रकरणात हसीना यांच्यासह बांग्लादेशचे माजी गृह मंत्रीही आरोपी आहेत.

याच कारणामुळे आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध बंड पुकारले आहे. इतकेच नव्हे, तर सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असलेल्या शेख हसीना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी युनुस सरकार अमेरिकेचे प्यादे असल्याचा आरोप केला आहे.

युनुस सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की ही हिंसा हसीना शेख यांच्या सांगण्यावरूनच होत आहे. शेख पुन्हा एकदा बांग्लादेशला अशांततेच्या आगीत ढकलू पाहत आहेत. सरकारने नागरिकांना 13 नोव्हेंबर रोजी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

बांग्लादेश पोलिसांनी हिंसा रोखण्यासाठी गेल्या 24 तासांत आवामी लीगच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलीस या कार्यकर्त्यांना संशयाच्या आधारे ताब्यात घेत आहेत.

बांग्लादेश सरकारच्या माहितीनुसार, आंदोलन दडपण्यासाठी पोलीस आणि सैन्यदलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच गुप्तचर यंत्रणेलाही हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Dadar Video – दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात संतापजनक प्रकार, लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल Dadar Video – दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात संतापजनक प्रकार, लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रविवार असो अथवा कोणता सण पार्कात तरुणाईसह सर्वच वयोगटातील लोकांची...
ऋषिकेशमध्ये बंजी जंपिंग करताना रोप तुटला, तरुण 180 फूट उंचीवरून खाली कोसळला
Delhi bomb blast update – तपास यंत्रणांना मोठे यश, अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमधून चौथी संशयित कार जप्त
राष्ट्रवादीला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह अखेर वगळलं
स्वत:ला मूर्ख बनवता येणार नाही, जावेद अख्तर यांनी AIच्या आव्हानांवर केले सावध
पत्नीचे भटक्या कुत्र्यांवर प्रेम, पतीला हवा घटस्फोट; गुजरातच्या व्यक्तीची उच्च न्यायालयात धाव
IPL 2026 – मिनी लिलावापूर्वी कोलकाताची मोठी खेळी; अष्टपैलू खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी