दिल्लीत प्रदूषणाची गंभीर समस्या, मास्कही पुरेसे नाहीत! सर्वोच्च न्यायालय

दिल्लीत प्रदूषणाची गंभीर समस्या, मास्कही पुरेसे नाहीत! सर्वोच्च न्यायालय

दिल्लीत वाढत चाललेल्या आणि गंभीर स्थितीला पोहोचलेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली आहे. केवळ मास्क घालणे पुरेसे नसल्याचे सांगत, न्यायालयाने ज्येष्ठ वकिलांना पुढील सुनावणीसाठी ऑनलाइन पद्धतीने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची परिस्थिती ‘अतिशय गंभीर’ असल्याचे वर्णन करत, सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकिलांना प्रश्न केला की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा असतानाही ते न्यायालयात प्रत्यक्ष का उपस्थित राहिले?

न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा यांनी ज्येष्ठ वकिलांना कडक शब्दांत विचारले की,’तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आला आहात? आमच्याकडे व्हर्च्युअल सुनावणीची (Virtual Hearing) सोय आहे. कृपया त्याचा लाभ घ्या. प्रदूषणाच्या समस्येमुळे नुकसान होऊ शकते.’

ते पुढे बोलताना, दिल्लीतील हवेच्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ‘मास्कही पुरेसे नाहीत. ते उपयोगी ठरणार नाही. आम्ही याबाबत सरन्यायाधीशांशीही चर्चा करू’, असे म्हटले.

सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘गंभीर’ श्रेणीत राहिल्याने गुरुवारी सकाळी शहरभर धुराचे दाट थर पसरलेले दिसले.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘गंभीर’ स्तरावर पोहोचल्यास निरोगी व्यक्तींसाठीही आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतो आणि ज्यांना श्वसनाचे किंवा हृदयविकारांचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी ती अधिक वाईट स्थिती आहे, असे मत अभ्यासक मांडतात.

दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाची परिस्थिती गंभीर बनली असून, शेजारील राज्यांमध्ये होणारी पेंढा जाळण्याची समस्या ही विषारी धुराला हातभार लावणारे प्रमुख कारण ठरत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसातील स्थिती लक्षात घेतली तर आसपासच्या इमारती आणि रस्ते देखील धुरात अस्पष्ट दिसत होते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, सकाळी ८ वाजता बावना (Bawana) येथे सर्वाधिक ४६० इतका हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नोंदवला गेला, तर एनएसआयटी द्वारका (NSIT Dwarka) येथे तो सर्वात कमी २१६ होता.

आकडेवारीनुसार, सकाळी ८ वाजता अनेक महत्त्वाच्या देखरेख केंद्रांवर धोकादायक AQI रीडिंग्ज नोंदवली गेली: आनंद विहार (४३१), बावना (४६०), चांदणी चौक (४५५), अशोक विहार (३४८), नॉर्थ कॅम्पस डीयू (४१४), द्वारका सेक्टर ८ (४००), आयटीओ (४३८), मुंडका (४३८), नरेला (४३२) आणि रोहिणी (४४७).

पेंढा जाळण्याच्या समस्येची दखल!

याआधी, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा या राज्यांना, दिल्लीतील हवामान खालावत असताना पेंढा जाळण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचललेल्या उपाय योजनांचा सविस्तर डेटा सादर करण्याचे निर्देश दिले होते.

या दोन्ही राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांना एका आठवड्यात संबंधित डेटा गोळा करून तो सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Dadar Video – दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात संतापजनक प्रकार, लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल Dadar Video – दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात संतापजनक प्रकार, लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रविवार असो अथवा कोणता सण पार्कात तरुणाईसह सर्वच वयोगटातील लोकांची...
ऋषिकेशमध्ये बंजी जंपिंग करताना रोप तुटला, तरुण 180 फूट उंचीवरून खाली कोसळला
Delhi bomb blast update – तपास यंत्रणांना मोठे यश, अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमधून चौथी संशयित कार जप्त
राष्ट्रवादीला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह अखेर वगळलं
स्वत:ला मूर्ख बनवता येणार नाही, जावेद अख्तर यांनी AIच्या आव्हानांवर केले सावध
पत्नीचे भटक्या कुत्र्यांवर प्रेम, पतीला हवा घटस्फोट; गुजरातच्या व्यक्तीची उच्च न्यायालयात धाव
IPL 2026 – मिनी लिलावापूर्वी कोलकाताची मोठी खेळी; अष्टपैलू खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी