तज्ज्ञांनी सांगितले हिवाळ्यात दररोज बाजरीची लापशी खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे
हिवाळा ऋतूचे आगमन झाले आहे. प्रत्येक ऋतूनुसार खाण्याच्या सवयी बदलू लागतात. तर थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अनेकजण त्यांच्या आहारात अधिक पौष्टिक आणि उबदार पदार्थांचा समावेश करतात. हिवाळ्यात अनेकजण बाजरीसह अनेक पारंपारिक धान्यांचा देखील त्यांच्या आहारात समावेश करतात. तर बाजरी हा हिवाळ्यातील सुपरफूड मानला जातो. ते खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते आणि उबदारपणा देखील जाणवतो. कारण बाजरीमध्ये आश्चर्यकारक गुणधर्म आहेत ज्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
बाजरीचा समावेश निरोगी धान्यात केला जातो. कारण यात आढळणारे पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे एकेकाळी फक्त ग्रामीण भागातच बाजरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. मात्र आजकाल लोकं तंदुरुस्तीबद्दल अधिक जागरूक होत आहेत. परिणामी शहरी भागातही अनेक पारंपारिक धान्ये लोकप्रिय होत आहेत. लोकं बाजरीच्या भाकरीपासून ते लापशीपर्यंत सर्व काही त्यांच्या आहारात समावेश करतात. तर आजच्या लेखात हिवाळ्यात दररोज बाजरीची लापशी खाल्ल्यास तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात हे तज्ञांकडून जाणून घेऊयात.
तज्ज्ञांचे मत
आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे यांच्या मते बाजरीची लापशी ही थंडीच्या दिवसात सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी नाश्त्यात लापशी खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल आणि आळस येणार नाही. गोड लापशी बनवण्यासाठी तुम्ही त्यात गूळाचा वापर करू शकता. चवदार व मसालेदार लापशीसाठी तुम्ही विविध भाज्या त्यात मिक्स करू शकता, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते. हिरवे मुग यात मिक्स केल्याने व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर होण्यास मदत होते. बाजरीत भरपूर फायबर असते, ज्यामुळे वजन कमी करण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ते एक उत्तम पर्याय आहे. दररोज एक वाटी बाजरीची लापशी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅस देखील दूर होतो. ओमेगा-3 मुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
उकडलेली बाजरी खाणे किती फायदेशीर आहे?
आहारतज्ज्ञ यांच्या मते उकडलेली बाजरी खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात. याच्या सेवनाने शरीरातील उर्जेची पातळी वाढवते आणि आळस दूर होते. बाजरी पोटासाठी हलकी मानली जाते, ज्यामुळे अल्सर किंवा अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांसाठी ते फायदेशीर ठरते. बाजरीमधील मॅग्नेशियमचे प्रमाण उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.
बाजरीची भाकरी देखील फायदेशीर आहे
बाजरी हा एक सुपरफूड आहे जो तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. लोकांना सामान्यतः बाजरीची भाकरी खायला आवडते, जी स्वादिष्ट आणि फायदेशीर दोन्ही मानली जाते. हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते आणि पचन सुधारते. तज्ञांच्या मते तुम्ही दिवसातून दोन भाकरी खाऊ शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List