चारकोपमध्ये शिवसेनेचा ‘जनता दरबार’, आमदारांनी जाणून घेतले नागरिकांचे प्रश्न

चारकोपमध्ये शिवसेनेचा ‘जनता दरबार’, आमदारांनी जाणून घेतले नागरिकांचे प्रश्न

मुंबईकरांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातही अनेक समस्या आहेत. तेथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने ‘जनता दरबार’चा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार कांदिवली पश्चिमेकडील चारकोप विधानसभा मतदारसंघात रविवारी शिवसेनेचा ‘जनता दरबार’ पार पडला. या वेळी शिवसेना आमदारांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवडय़ात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.

चारकोप विधानसभा मतदारसंघातील (विभाग क्र. 2) शिवसेना शाखा क्र. 20 आणि 21च्या वतीने ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू आणि आमदार अनंत (बाळा) नर यांनी चारकोप परिसरातील नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. ते प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱयांना पह्न कॉल करून तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. तसेच यासंदर्भात पुढील आठवडय़ात अधिकाऱयांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत. शिवसेनेचे आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघांत मुंबईतील इतर आमदार जाणार आहेत आणि ‘जनता दरबार’च्या माध्यमातून तेथील जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे सुनील प्रभू यांनी सांगितले. या वेळी ‘जनता दरबार’चे आयोजक, विभागप्रमुख संतोष राणे, महिला विभाग संघटक मनाली चोकीदार, शुभदा गुडेकर, गीता भंडारी, अभिषेक शिर्पे, विधानसभा प्रमुख राजू खान, पैलास कणसे, संतोष धनावडे, सुषमा कदम, विधानसभा संघटक राजेंद्र निकम, सत्यवान वाणी, सुवर्णा प्रसादे, सविता देसाई, उपविभाग प्रमुख शाम मोरे, अनंत नागम, आशीष पाटील आदी पदाधिकारी तसेच संयोजक शाखाप्रमुख विजय मालुसरे, रवींद्र मर्ये उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधाचे आश्चर्य फायदे, हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध  खा आणि काय बदल होतोय ते पाहा… मधाचे आश्चर्य फायदे, हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध खा आणि काय बदल होतोय ते पाहा…
हिवाळ्यात तापमान कमी होते, ज्यामुळे विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ज्यांना आधीच काही आजार आहेत त्यांच्यासाठी थंडीचा काळ खूप आव्हानात्मक...
महसूलमंत्री असताना मुंढवा जमीन प्रकरणाची फाईल मी नाकारली होती, बाळासाहेब थोरात यांचा गौप्यस्फोट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशहून 9700 बॅलेट, 4877 कंट्रोल युनिट दाखल
मोठी बातमी – डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX, एके-47 आणि जिवंत काडतूस जप्त; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला
ठाणे महापालिकेत नवीन कॅफो, जुना कॅफो; नवे वित्त अधिकारी येऊनही सह्या मात्र जुन्याच अधिकाऱ्याच्या
तारापूरमध्ये पाच वर्षांत 48 कामगारांचा बळी; 90 जण जायबंदी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
झोपेतच काळाचा घाला; घराचं छत कोसळून अख्खं कुटुंब ठार, मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश