भाईंदरमध्ये 50 अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर, पालिकेची धडक कारवाई
काशिगाव येथील पालिकेच्या आरक्षित जागेत भूमाफियांनी 100 हून अधिक अनधिकृत झोपड्या बांधल्या होत्या. मीरा-भाईंदर महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत या झोपड्यांवर बुलडोझर फिरवला. दिवसभरात 50 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. सर्व अनधिकृत झोपड्या भुईसपाट करेपर्यंत कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे.
काशिगाव पोलीस ठाण्याच्या बाजूलाच महापालिकेचे आरक्षण क्रमांक 3२0 आहे. या जागेचा टीडीआर जागामालकाला दिल्यानंतर महापालिकेने ती जागा ताब्यात घेतली. या जागेवर महापालिकेने बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपातील 180 खोल्या बांधल्या. तर उर्वरित जागा महापालिकेने रिकामी ठेवली होती. याचा गैरफायदा घेत भूमाफियांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या जागेवर 100 पेक्षा जास्त झोपड्या बांधल्या.
10 लाखांना विक्री
भूमाफियांनी काही खोल्या 4 हजार रुपये महिना भाड्याने दिल्या होत्या. तर काही खोल्या 9 ते 10 लाख रुपयांना विकल्या. या गोरख धंद्याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी आल्यावर प्रशासन जागे झाले. प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांच्या पथकाने शुक्रवारी त्या अनधिकृत झोपड्यावर तोडक कारवाई सुरू केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List